वन खात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्या विरोधात शेतकऱ्याचे आमरण उपोषण

भोकर : माधव मेकेवाड – शेतकऱ्याने वन खात्याविरोधात उपोषण सुरु केले आहे. उपोषण कर्ते हे नाभिक समाजाचे गरीब कुटुंबातील व्यक्ती आहेत. कुटुंबातील व्यक्तींना वन खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी त्रास देत असल्यामुळे शेतकऱ्याने उपोषण सुरु केले आहे. शेतकऱ्याने उपोषण सुरु केलेल्यानंतर देखील वरिष्ठांनी त्याची दखल घेतली नसून एकही अधीकारी या ठिकाणी फिरकला नाही.

रामदास गणपती लिंगमपले वय 46 वर्ष धंदा शेती व शेतमजुरी रा.मौजे धारजनी ता भोकर जि नांदेड यांचे उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे आमरण उपोषण सुरू अनेक दिवसांपासून संबंधित अधिकारी यांनी त्यांच्या मुलांना व परिवारातील लोकांना त्रास दिल्यामुळे व त्यांच्या मालकी जमिनीत नाली खोद काम करून लाखो रुपयांचे पिकांची नुकसान केले असल्याबद्दल ची तक्रार उपविभागीय अधिकारी भोकर यांना दिली होती. त्यावर कुठलीही कार्यवाही न झाल्याने अर्जदाराने उपोषणाचा मार्ग अवलंबलेला दिसून आला उपोषण कर्त्याची तब्बेत खालावली असून गेल्या चार दिवसांपासून संबधीत कार्यालयाकडून कुठलीही विचारणा झाली नसल्याचे समजले आहे.

सदर गटामधील अर्जदाराच्या मालकीची आहे.  जमीनितील उभ्या पीकामध्ये वन परीक्षेत्र विभागातील कर्मचारी व अधिकारी मौजे मोघाळी बीटचे वनपालन व्ही.टी.राठोड शेरेदार,  विभुते मँडम व त्यांचे पती व हजरी मजुर, राम राठोड बोथी बिटचे चौकीदार या सह अन्य कर्मचारी वनजमीन मुळ घटनेच्या वेळी व सदय स्थितीत दासरवाड, रेंजर हिरवे, ए एन विभुते मँडम, व्यवहारे यांनी कोऱ्या कागदावर तु सही कर म्हणुन माझा मुलाशी वाद घातला. ह्या प्रकारची तक्रार देऊन उपोषण कर्ता उपोषण करण्यासाठी बसला असून अजून कुठलीही शहानिशा केली नसण्याचे समजतेय.

मुळ घटनेच्या वेळी  जबरदस्तीने झटामुटी करून त्यांच्या परिवारावर हल्ला देखील केला  माझा परीवारावर हल्ला  करुन जानीव पुर्वक डोजर (जे सी बी) ने नाली खोदकाम केले त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे व नुकसान भरपाई मिळाली पाहिजे असे त्यांनी सांगितले
सदरील जागा वन खात्याची असून तिची पाहणी सॅटेलाईट द्वारे केली सदरील उपोषण कर्ता खोटी तक्रार केला आहे शासकीय जमिनीत आहे म्हणून नाली खोद काम केले आहे त्याचे आरोप खोटे आहेत असे सांगितले