शेतकर्‍यांच्या आत्महत्येला शरद पवार जबाबदार, संघटनेतील नेत्याचा आरोप

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – शेतकऱ्यांच्या आत्महत्येला शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केली. ते म्हणाले की शरद पवार जसे चांगल्या कामाचे श्रेय घेतात तसे अपश्रेय घेणंही गरजेचे आहे. चांगल्या कामाचे श्रेय आम्ही त्यांना देऊ, परंतु शेतकरी आत्महत्येची जबाबदारी त्यांनी स्वीकारवी अशी देखील टीका रघुनाथदादा पाटलांनी केली.

रघुनाथदादा पाटील म्हणाले की शरद पवार गेल्या 50 वर्षापासून देशाच्या आणि राज्यांच्या राजकारणात आहेत. अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. शरद पवार स्वताला शेतकऱ्यांचे जाणते राजे म्हणवतात. जे स्वत:कडे विकासाचं श्रेय घेतात, तसे शेतकऱ्यांबाबत आलेल्या अपयशाची जबाबदारीही त्यांनी घ्यावी. तसेच आगामी काळात शेतकऱ्यांविरोधातील कायदे दूर करण्यासाठी आपण व्यापक चळवळ उभारणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

रघुनाथ दादा पाटील यांनी पंतप्रधान मोदींवर देखील निशाणा साधला. ते म्हणाले की या देशात सरकार बदललं, परंतु फक्त नेत्यांची नावं बदलली. शेतकऱ्यांविरोधी कायदे आहेत ते तसेच आहेत. नेहरुंपासून मोदींपर्यंत सर्वांनी शेतकरी विरोधी धोरण राबवली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like