आजपासून आणखी तीव्र होणार शेतकरी आंदोलन, दिल्ली-जयपुर आणि आग्रा हाय-वे जाम करणार

नवी दिल्ली : भारतीय किसान यूनियनचे अध्यक्ष बलबीर. एस. राजेवाल यांनी म्हटले की, आम्ही 12 डिसेंबरला दिल्ली-जयपुर रोड ब्लॉक करू. यानंतर 14 डिसेंबरला देशभरातील शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालये आणि भाजपा नेत्यांच्या घरांसमोर आंदोलन करणा आहोत. सोबतच आम्ही आज टोल प्लाझा ब्लॉक करणार आहोत. यामुळे शेतकरी आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.

ट्रेन रोखणार नाही – नेते
राजेवाल यांनी स्पष्ट केले की शेतकरी कोणतीही ट्रेन रोखणार नाहीत. येथे येणार्‍या शेतकर्‍यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. शेतकरी पहिल्या दिवसांपासून तीनही कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. आता शेतकर्‍यांनी आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याचा विचार केला आहे. शेतकरी आज 12 डिसेंबरला देशभरातील टोलनाके फ्री करण्याच्या तयारीत आहेत. तर 14 डिसेंबरला देशभरात भाजपा नेत्यांच्या घरांना घेराव घालणे आणि जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर आंदोलन करण्याची योजना आहे. आज शेतकरी हाय-वे जाम करणार आहेत.

तत्पूर्वी मोदी सरकारने असा दावा केला आहे की, अल्ट्रा-लेफ्ट नेते आणि समर्थक डाव्या उग्रवादी तत्वांनी शेतकरी आंदोलन हायजॅक केले आहे. गुप्तचर यंत्रणांचा हवाला देत मोदी सरकारने म्हटले आहे की, दशहतवादी संघटना येत्या काही दिवसात शेतकर्‍यांना हिंसा, जाळपोळ आणि सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करण्यासाठी भडकावण्याची योजना बनवत आहेत.

जर असे लोक दिसले तर कारवाई करा : राकेश टिकैत
गुप्तचर विभागाच्या रिपोर्टवर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, आम्हाला तर असे लोक येथे दिसत नाहीत. तरी सुद्धा जर गुप्तचर एजन्सीची नजर आंदोलनावर आहे तर त्यांनी त्यांना पकडावे, ते केवळ बघत का बसले आहेत. आपली केंद्रीय गुप्तचर एजन्सी इतकी कमजोर नाही, जी त्यांना पकडू शकत नाही. जे लोक चुकीचे काम करत आहेत, त्यांच्यावर लक्ष ठेवावे.