Gold Rate : चार दिवसांत सोन्याच्या दरात 1500 रूपयांची वाढ

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कोरोना प्रतिबंधात्मक लस शोधण्यात संपूर्ण जग शर्थीचे प्रयन्त करत आहे. आता कोरोना साथीला अटकाव घालणे शक्य होणार आहे. कारण, कोरोना प्रतिबंधात्मक लशीच्या उत्पादनाला वेग आला आहे. दरम्यान, कोरोनाचा परिणाम सोने आणि चांदीच्या किमतीवर झालेला पहिला मिळाला. गेल्या महिन्यात या मौल्यवान धातूंमध्ये नफा वसुली झाली होती. यामुळे सोन्याचा भाव ४८ हजारांखाली आला होता. मात्र, सोन्याने या घसरणीची भरपाई केली आहे.

कोरोना अजूनही असला तरी सराफा बाजारातील तेजीचा सिलसिला आज कायम आहे. सध्या मल्टी कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याचा भाव सकाळी ०.२ टक्क्यांनी वधारला आणि तो प्रती १० ग्रॅम ४९३८० रुपयांवर गेला होता. चांदीमध्ये ०.२ टक्क्यांची वाढ झाली आणि एक किलोचा भाव ६३७६७ रुपयांवर गेला होता.

आरबीआयनं घेतला हा निर्णय…

गुरुवारी सोने ३५० रुपयांनी तर चांदी ३०० रुपयांनी महागली होती. मागील चार सत्रात सोने १५०० रुपयांनी महागले आहे. मात्र सार्वकालीन उच्चांकी स्तराच्या तुलनेत सोने अजूनही ७००० रुपयांनी स्वस्त आहे. सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४९२४५ रुपये आहे. त्यात ५७ रुपयांची किरकोळ घसरण झाली आहे. एक किलो चांदीचा भाव ६३९२५ रुपये असून त्यात २९५ रुपयांची वाढ झाली आहे. मात्र, सार्वकालीन उच्चांकी स्तराच्या तुलनेत सोने अजूनही ७००० रुपयांनी स्वस्त आहे. सोन्याप्रमाणेच मागील चार दिवसांत चांदीमध्ये सरासरी २००० रुपयांची वाढ झाली आहे.

इंधन भडका …

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, मुंबईत पेट्रोल नव्वदीच्या दिशेने चालेले आहे. तर डिझेल ८० च्या उंबरठ्यावर पोचलेले आहे. फायजर कंपनीने करोना लस उत्पादनाचे उद्दिष्ट कमी केलं आहे. त्यामुळे सोने आणि चांदीच्या किमतीना आधार मिळाला असल्याचे जाणकारांनी सांगितले. त्याशिवाय अमेरिकेची नियोजित अध्यक्ष जो बायडन यांनी अमेरिकन काँग्रेसला ९०८ अब्ज डॉलरच्या आर्थिक पॅकेजला मंजुरी देण्याचे आवाहन केले आहे. आज जागतिक बाजारात स्पॉट गोल्डचा भाव प्रती औंस ०.१ टक्क्यांनी वाढून १८४१.९० डॉलर झाला. आठवडाभरात सोन्यात ३ टक्के वाढ झाली आहे. त्याशिवाय चांदीचा भाव २४.०७ डॉलरवर आहे.

आज शुक्रवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८३३० रुपये आहे. तर २४ कॅरेटचा भाव ४९३३० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेटचा भाव ४८२५० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५२६३० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेटसाठी ग्राहकांना ४७५२० रुपये मोजावे लागतील. तर २४ कॅरेटचा भाव ५०६२० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेटचा सोन्याचा दर ४६५६० रुपये असून २४ कॅरेटसाठी ५०७९० रुपये आहे, अशी goodreturns या वेबसाईटकडून प्राप्त झाली आहे.