ठाकरे सरकारची वचनपूर्ती ! कर्जमाफ झालेल्या 15358 शेतकर्‍यांची पहिली यादी जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शेतकरी कर्जमाफीसंदर्भात मोठी घोषणा केली होती. शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याच सरकारचे प्रयत्न असून, पहिली यादी सोमवारी (दि.24) जाहीर करणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर काही तासात शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी सरकारकडून जाहीर करण्यात आली. या अधिवेशनामध्ये ठाकरे सरकारने आपली वचनपूर्ती केली आहे.

कर्जमाफी झालेल्या पहिल्या यादीत राज्यातील 68 गावातील शेतकऱ्यांची नावे आहेत. तब्बल 9 हजार शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, कृषीमंत्री दादा भुसे उपस्थित होते. ज्या शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला होता. त्या दोन हजार शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात पैसे वळते करण्यात आले आहेत. प्रत्येक जिल्ह्याची यादी पालकमंत्र्यांकडे सुपूर्द करण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या. एप्रिल अखेर या योजनांची अमलबजावणी होण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीत 15 हजार 358 शेतकऱ्यांची नावे आहेत. लवकरच दुसरा टप्पा जाहीर होणार आहे.

राज्य सरकारनं कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करण्यापूर्वी 34 लाख 83 हजार 908 खात्यांची माहिती संग्रहित केली होती. कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांना तसं प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. जिल्हा पातळीवर कर्जमाफीच्या अंमलबजावणीचं काम सुरु झालं असून सरकार कर्जमाफीसाठी पुरवणी मागणी सभागृहाच्या पटलावर ठेवली आहे. यावर 27 फेब्रुवारी आणि 2 मार्च रोजी चर्चा होणार आहे.

पहिली यादी जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगर, परभणी, अमरावती व पुणे जिल्ह्यातील प्रत्यक्ष लाभ मिळालेल्या जिल्ह्यातील दोन पात्र लाभार्थी शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. पहिल्या टप्प्यात दोन लाखांच्या आत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी होता. तर दुसरा टप्पा दोन लाखांवर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राहणार आहे.