शेतकरी आंदोलनादरम्यान दिल्लीत हिंसेची शंका, गृहमंत्री अमित शाह यांची अधिकार्‍यांसोबत हायलेव्हल बैठक

नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकर्‍यांना पाहता गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी वरिष्ठ पोलीस आणि सुरक्षा अधिकार्‍यांसोबत बैठकी घेतली. त्यांनी दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात कोणत्याही प्रकारची हिंसा रोखण्याच्या पद्धतीवर चर्चा केली.

माहितीनुसार, मोदी सरकारने गुप्तचर एजन्सीजचा संदर्भ देऊन अशी शंका व्यक्त केली आहे की, आंदोलनकर्त्यांमध्ये काही असामाजिक तत्व अशीही आहेत, ज्यांचा उद्देश हिंसा पसरवणे असू शकतो, यावर चर्चा करण्यात आली. असा अंदाज वर्तवण्यात येत आहे की, आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांमध्ये कमीत कमी 10 असे समुह उपस्थित आहेत जे हे आंदोलन हिंसक करण्याचा प्रयत्न करू शकतात.

दरम्यान, शेतकरी संघटना तीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत आहेत. ही मागणी मोदी सरकारने फेटाळली आहे.

शेतकरी संघटनांनी म्हटले आहे की, शनिवार, 12 डिसेंबरला शेतकरी दिल्ली-जयपुर राज्यमार्ग जाम करणार आहोत. शेतकर्‍यांनी 14 डिसेेंबरला सुद्धा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.