देओल कुटुंबावर शेतकरी संतप्त; पंजाब-हरियाणात शुटिंग करू न देण्यावर ठाम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांकडून गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. आता हेच आंदोलन बॉलिवूडसाठी डोकेदुखीचे ठरत आहे. शेतकऱ्यांकडून कृषी कायद्याला विरोध केला जात आहे. पण त्यानुसार अनेक ठिकाणी चित्रपट शुटिंगही थांबवण्यात आले आहे.

आता या लिस्टमध्ये बॉलिवूडचे प्रसिद्ध देओल कुटुंबाचाही समावेश आहे. पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांकडून देओल कुटुंबावर नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी सांगितले, की ते देओल कुटुंबाला या दोन राज्यांमध्ये शुटिंग करू देणार नाहीत. त्यानुसार, अभिनेता बॉबी देओल याचा चित्रपट ‘लव्ह हॉस्टेल’ची शुटिंग थांबवली होती. चित्रपटाच्या क्रू यांना शुटिंगविनाच परत जाण्याचे सांगितले होते. मात्र, त्यावेळी बॉबी देओल हे उपस्थित नव्हते.

दरम्यान, देओल कुटुंबाचे तीनही सदस्य भाजपच्या अत्यंत जवळचे आहेत. एका बाजूला सनी देओल आणि हेमा मालिनी खासदार आहेत. तर धर्मेंद्रही सरकार समर्थनात असतात. त्यामुळे शेतकरीही याच मुद्द्यावरून देओल कुटुंबाला घेरत आहे.

शेतकरी आंदोलनावर हेमा मालिनी यांनी केलेल्या वक्तव्यावरूनही मोठा वाद निर्माण झाला आहे. याशिवाय रिहानाच्या ट्विटनंतर हेमा मालिनी यांनी तिच्यावर टीका केली होती. त्यामुळे शेतकरी नाराज झाले होते.

काय म्हणाल्या होत्या हेमा मालिनी…
भारतासारख्या देशाबाबत ही लोकं अशाप्रकारचे वक्तव्य करत आहे. त्यामुळे मी हैराण झाले आहे. देशाच्या अंतर्गत प्रकरणावर बोलत आहेत. असे केल्याने त्यांना काय मिळते. ते कोणाला खुश करण्यासाठी बोलत आहे, असे वक्तव्य हेमा मालिनी यांनी केले होते.