शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आता अमेरिकन उपाध्यक्ष कमला हॅरिसच्या भाचीने देखील उठविला आवाज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या दोन महिन्यांपासून नव्या कृषी कायद्याविरुद्ध देशभरात आंदोलन सुरु आहे. देशाबरोबरच जगभरातील प्रसिद्ध व्यक्ती या आंदोलनाला समर्थन देत आहे. अ‍ॅक्टिविस्ट ग्रेटा थनबर्ग आणि अमेरिकन पॉप सिंगर रिहाना नंतर आता अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिसच्या भाचीने देखील कृषी कायद्याविरुद्ध आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आपले समर्थन दिले आहे. मीना हॅरिसने बुधवारी शेतकऱ्यांना समर्थन देत म्हंटले कि, जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेली लोकशाही धोक्यात आहे.

कमला हॅरिसची भाची मीना हॅरिस पेशेने वकील आहे. मीना हॅरिसने कॅपिटल हिलमधील हिंसाचार आणि भारतात होणाऱ्या शेतकरी आंदोलनाला जोडत अनेक ट्विट केले आहे. मीना हॅरिस अमेरिकन प्रतिनिधी अलेक्झांड्रिया कॉर्टेजच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया व्यक्त करत होती. ज्यामध्ये तिने अमेरिकेतील कॅपिटल हिलमधील ट्रम्प समर्थकांबद्दल आपले मत सांगितले. मीना हॅरिसने लिहिले की, “मी आभारी आहे कि, कॉर्टेजने आपला आघात सर्वांसमोर प्रकट केला. परंतु मी यामुळे नाराज आहे कि, याबाबत कोणतीही जबाबदारी निश्चित केलेली नाही. कॉंग्रेसच्या कोणत्याही सदस्याला हद्दपार केले नाही, ही लाजिरवाणी गोष्ट आहे.’

https://twitter.com/meenaharris/status/1356747965713371138

या ट्विटनंतर भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा एक फोटो ट्विट करत मीना हॅरिसने लिहिले, हा योगायोग नाही कि, जगातील सर्वात जुन्या लोकशाहीवर (अमेरिका) एका महिन्यापूर्वी हल्ला झाला आणि आता जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला धोका आहे. या दोन्ही घटना जोडलेल्या आहे. आपण भारतात आंदोलनाच्या विरुद्ध सुरक्षा दलाचा हिंसाचार आणि इंटरनेट बंद केल्या जाण्यावर आक्रोशीत झाले पाहिजे. मीना हॅरिसने पुढे लिहिले, “कॅपिटल हिलमधील हिंसाचाराबद्दल आपण ज्याप्रकारे प्रतिक्रिया दिली त्याप्रमाणे आपण शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया व्यक्त केली पाहिजे. कारण फॅसिझम कोणत्याही ठिकाणी प्रत्येक लोकशाहीसाठी धोकादायक आहे. ट्रम्प यांचा कार्यकाळ संपला असला तरी, आपल्या सभोवताल पहा – त्या लाटा अजूनही उफाळत आहे. ”

मीना हॅरिसने लिहिले, “सैनिकी राष्ट्रवाद अमेरिकन राजकारणात, भारत किंवा इतरत्रही तितकीच सामर्थ्यशाली शक्ती आहे. हे तेव्हाच थांबविले जाऊ शकते, जेव्हा लोकांना हे वास्तव लक्षात येईल फॅसिझम हुकूमशहा कुठेही जाणार नाही. जोपर्यंत आपण एकत्र येणार नाही आणि कॅपिटल हिलसारख्या घटनांचे कोणतेही परिणाम होणार नाहीत. ” मीना हॅरिसने शेवटी लिहिले कि, सत्यासोबत एकतेचा जन्म होतो. जबाबदारी निश्चित केल्याशिवाय जखमा भरणे अशक्य आहे. आपला आवाज वाढवा आणि तडजोड करू नका. ”

दरम्यान, मीना हॅरिसच्या आधी शेतकरी आंदोलनासंदर्भात अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी आवाज उठविला. यात अनेक प्रसिद्ध व्यक्तिमहत्वांचा समावेश आहे. यात अमेरिकन पॉप सिंगर रिहाना आणि अ‍ॅक्टिविस्ट ग्रेटा थनबर्ग यांचा समावेश आहे. अमेरिकन पॉप सिंगर रिहाना माइक्रोब्लॉगिंग वेबसाइटवर फॉलोअर्सच्या बाबतीत चौथ्या नंबरवर आहे. रिहानाने शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आवाज उठविला. तिने शेतकरी चळवळीच्या पार्श्वभूमीवर इंटरनेट बंद केल्याच्या बातमीला ट्विट करत लिहिले कि, आपण यासंदर्भात बोलत का नाही. त्याचवेळी क्लायमॅट अ‍ॅक्टिविस्ट ग्रेटाने आपल्या ट्विटमध्ये लिहिले कि, आम्ही भारतात सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात एकता जाहीर करतो.

ह्यूमन राईट्स वॉचचे कार्यकारी संचालक केनेथ रोथ यांनीही ट्विट करून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. रॉथने लिहिले कि, नरेंद्र मोदी सरकार आपल्या हिंदु राष्ट्रवादीच्या अजेंडाच्या उद्देशाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य संपवत आहे. नागरिकत्व विषयी भेदभाव करणारे धोरण, दलित आणि आदिवासींना उपेक्षित ठेवण्याच्या विरोधात आंदोलक याला बळी पडत आहे. आता सरकार शेतकऱ्यांना लक्ष्य करीत आहे, त्यातील बहुतेक शिख आहेत.