राजू शेट्टी हे कारखानदारांनी पोसलेले नेतृत्व – रघुनाथ दादा पाटील 

इस्लामपूर : पोलीसानाम ऑनलाइन – राजू शेट्टी हे कारखानदारांनी पोसलेले नेतृत्व आहे.अशी जहरी टीका शेतकरी चळवळीचे नेते रघुनाथ पाटील यांनी केली आहे. एफआरपीचे तुकडे  करणारे राजू शेट्टी आता एकत्रित एफआरपी मागू लागले आहेत. त्यांनी आता साखर सम्राटांच्या पक्षांना जवळ केले आहे. म्हणून मी दहा वर्षांपूर्वी बोललेले विधान आता खरे होताना दिसत आहे असे रघुनाथ दादा पाटील म्हणाले आहेत.

कारखाने सुरु होऊन दोन महिने उलटून गेले तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप एफआरपी जमा झालेली नाही. तरी राजू शेट्टी यांनी मौन का बाळगले आहे. या विषयावर शेट्टी का बोलत नाहीत कारण ते साखर सम्राटांच्या मांडीला मांडी लावून बसू लागले आहेत. त्यांच्या अशा वागण्यामुळेच त्यांनी शेतकरी चळवळीचे  नुकसान केले आहे असे रघुनाथ दादा म्हणाले आहेत.  इस्लामपूर येथे पत्रकार परिषदेत रघुनाथ दादा पाटील हे बोलत होते. राजू शेट्टी यांच्या मतदार संघात येऊन त्यांच्यावर अशी जहरी टीका केल्याने आता रघुनाथदादा विरुद्ध राजू शेट्टी असा कलगी तुरा रंगण्याची शक्यता आगामी काळात आहे.

भाजप, सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे एकाच माळेचे मनी आहेत. यांना शेतकऱ्यांचे काहीच पडलेले नाही. शेतकऱ्याच्या प्रश्नांकडे कोणालाच बघायला वेळ नाही त्यांचे जागावाटप साध्य जोरात चालले असून त्यांच्या राजकारणापुढे शेतकऱ्यांचे प्रश्न तुच्छ आहेत. शेतकऱ्यांनी लोकांना आमदार खासदार केले तर या आमदार खासदार झालेल्या शेतकरी नेत्यांनी शेतकरी चळवळ मोडीत काढली असे रघुनाथ दादा म्हणाले आहे. गेल्या वर्षी राजू शेट्टी हे फडणवीसांच्या मांडीला होते. त्यांच्याही संगनमत करून शेट्टींनी शेतकऱ्याच्या एफआरपीचे तुकडे पडले पण आता शेट्टी सहित कोणत्याच राजकीय नेत्यांना शेतकऱ्यांवर आणि त्याच्या एफआरपी मुद्द्यावर बोलायचे नाही असे रघुनाथ दादा पाटील म्हणाले आहेत. तर शेतकऱ्यांची थकीत एफआरपी शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी आम्ही न्यायालयीन लढाई लढणार आहोत असे रघुनाथ दादा पाटील यांनी सांगितले आहे.