अहमदनगर : दूध उत्पादक शेतकऱ्याची आत्महत्या

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – नगर तालुक्यातील मेहेकरी येधील अतुल पवार (वय २४) या दूध उत्पादक शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

जनावरांना पिण्यासाठी पाणी व चारा उपलब्ध नसल्याने आत्महत्या केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. नगर तालुक्यात चारा छावण्या बंद झाल्याने यापूर्वी दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. ही घटना ताजी असतानाच तिसरी आत्महत्येची घटना झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नगर तालुका पोलिसांकडून सदर घटनेचा तपास सुरू आहे. पवार यांनी जनावरांना चारा व पाणी उपलब्ध नसल्याने आत्महत्या केली, असे ग्रामस्थांचे आहे. त्यामुळे मेहकरी ग्रामस्थांनी प्रशासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. नगर तालुक्यात चारा छावण्या बंद झाल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे सत्र सुरू आहे. तरीही प्रशासन निर्धास्त आहे. त्यामुळे संतापाची लाट पसरली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like