जनावरांच्या छावण्या बंद केल्याने शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या, जिल्ह्यात प्रचंड खळबळ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – प्रशासनाने जनावरांच्या छावण्या बंद केल्याने शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्या केली. नगर तालुक्यातील घोसपुरी शिवारात घडलेल्या या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी चारा छावण्या सुरू करण्यासाठी केलेल्या आंदोलनात हा शेतकरी सहभागी झाला होता. या आत्महत्येच्या घटनेमुळे चांगलाच तणाव निर्माण झाला आहे.

वसंत सदाशिव झरेकर हे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, नगर तालुक्यातील काही चारा छावण्या प्रशासनानेेे बंद केल्या आहेत. बंद केलेेेेला चारा छावण्या पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी नगर-पुणे रस्त्यावर तीन दिवसांपूर्वी रास्ता रोको केले होते. पोलिसांनी आंदोलकांंना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलन संपुष्टात आले. त्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी दुसऱ्या दिवशी तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केलेे होते.

यावेळी दोन दिवसात छावण्या सुरू करण्याचा निर्णय न घेतल्यास विष घेऊन आत्महत्या करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता. त्या आंदोलनात शिवसेनेचा कार्यकर्ता असलेल्या झरेकर या शेतकऱ्याने विषारी औषध आज सकाळी प्राशन केले. त्यांना उपचारासाठी तातडीनेेेे रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

छावण्या सुरू न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी व गुन्हे दाखल करावेत. अन्यथा मृतदेह ताब्यात न घेता जिल्हाधिकारी कार्यालयात मृतदेह ठेवण्याचा शिवसेना नेते व जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यानी इशारा दिला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –