धुळे : बोरविहीर येथील शेतकऱ्याची आत्महत्या

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – आजाराला कंटाळून बोरविहीर येथील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सुपडू खंडु पगारे (रविराज काॅलनी, बोरविहीर) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

सविस्तर माहिती अशी की, सुपडू पगारे हे शेती व्यवसाय करत. त्यांना अनेक दिवसांपासून मधुमेह व पाठदुखी आजाराने ग्रासले होते. अखेर आजाराला कंटाळून त्यांनी घरात कोणी नसताना घरातील किचन मधील छताला दोरी बांधुन गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. तालुका पोलीस स्टेशनला मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

You might also like