होमकार्ड कार्यालयाच्या आवारात शेतकर्‍याची आत्महत्या

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – धुळ्यातील वलवडी गावातील होमगार्ड कार्यालयाच्या आवारात शेतकऱ्याने सलाईनच्या नळीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बापू चिंधा धसनर (४५, रा. सतमाने) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

शेतकरी बापू धासनर हे बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. डाॅक्टरांनी त्यांना मोठा आजार असल्याचे सांगितले होते. डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि रुग्णालयात होणारा खर्च याला कंटाळून धासनर यांंनी होमगार्ड कार्यालयाच्या आवारातील जाहिरात फलकाच्या पोलला रुग्णालयातील सलाईन च्या नळीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी जावून पहाणी केली. पुढील तपास तालूका पोलीस करत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like