गळफास घेऊन आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पोल्ट्री फार्मसाठी त्याने खासगी सावकाराकडून ५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. पण, व्यवसायातून अपेक्षित पैसा मिळत नसल्याने व सावकाराचे देणे देण्यासाठी कोणाकडूनही मदत होत नसल्याने निराश झालेल्या तरुण शेतकऱ्याने त्याच पोल्ट्री फार्मच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. मराठवाडा, विदर्भातील आत्महत्याचे लोण आता पश्चिम महाराष्ट्रातही येऊ लागल्याचे अशा घटनांमधून पुढे येत आहे.

पुरंदर तालुक्यातील पांगारे गावानजीकच्या शिंदेवाडी भाटकळवाडीत हा प्रकार घडला. दत्तात्रय माणिकराव काकडे (वय २७) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.

याबाबत मिळालेली माहिती अशी, दत्तात्रय काकडे यांचे शिंदेवाडी येथे ५ हजार पक्ष्यांचे पोल्ट्रीचे शेड आहे. त्यासाठी त्यांनी काही स्थानिक सावकारांकडून ५ लाख रुपये व्याजाने घेतले होते. संबंधित सावकाराने या पैशांसाठी काकडे यांच्याकडे तगादा लावला होता. याबाबत काकडे यांनी एका खासगी पतपेढीत कर्जासाठी प्रयत्न केला. मात्र, पैशांच्या अडचणीबाबत त्यांनी मित्र परिवार किंवा कुटुंबीयांनाही याची माहिती दिली नाही. सावकाराला देण्यासाठी पैशांची जमवाजमव होत नसल्याने काकडे यांनी अखेर पोल्ट्री शेडमध्ये गळफास लावून आत्महत्या केली.

दत्तात्रय काकडे हे आईवडिलांना एकुलते एक होते. त्यांचे आठ महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. त्यांच्या मागे आईवडील, पत्नी असा परिवार आहे.

दररोज ‘हळदीचे पाणी’ घ्या आणि आश्चर्यकारक फायदे मिळवा

लुक बदलायचायं ? मग ‘या’ मेकअप टीप्स फॉलो करा

निद्रानाशाच्या गंभीर समस्येवर करा ‘हे’ घरगुती सोपे उपाय

लक्ष केंद्रित का होत नाही ? जाणून घ्या यामागील कारणे

अशा प्रकारेदेखील खावू शकता भाज्या, होतील अनेक फायदे

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात