जर मार्शल आले नसते तर उपसभापतींवर विरोधकांनी हल्ला केला असता : रविशंकर प्रसाद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभेतील मंजुरीनंतर कृषी संबंधित विधेयक राज्यसभेत मंजूर झाली आहेत. पण सध्या देशभरात या कृषी संबंधित विधेयकावर शेतकरी आंदोलने करत असून विरोधी पक्षानिही टीका केल्या आहेत. राज्यसभेतील रविवारी झालेल्या गदारोळात राज्यसभा उपसभापतींचा झाला, असं केंद्र सरकार म्हटलं आहे. त्याच वेळी केंद्र सरकारच्या तीन मंत्र्यांनी राज्यसभेचे उपाध्यक्ष यांच्या बरोबर झालेल्या या घटनेसंदर्भात पत्रकार परिषद घेतली आहे.

केंद्र सरकारचे तीन मंत्री रविशंकर प्रसाद, प्रल्हाद जोशी आणि पियुष गोयल यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांच्या अनादरचा मुद्दा उपस्थित केला आणि त्या घटनेस दु:खद म्हटले आहे. यापूर्वी कालच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह केंद्र सरकारच्या सहा मंत्र्यांनीही पत्रकारांशी चर्चा केल्यानंतर हा मुद्दा उपस्थित केला होता.

पत्रकार परिषदेदरम्यान केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की, ‘जर विरोधकांना मत द्यायचे असते तर त्यांनी जागेवर जायला हवे होते. राज्यसभेत 13 वेळा उपसभापतींनी खासदारांना पुन्हा जागेवर जाण्याची विनंती केली. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. संसदेसाठी हा मोठा लाजिरवाणा दिवस होता. माईक तुटला, वायर तुटली, मॅन्युअल देखील फाडलं आहे. जर मार्शल आले नसते तर उपसभापतींवर शारीरिक हल्लाही होऊ शकला असता.’

रविशंकर प्रसाद म्हणाले की अशी कृती आपण यापूर्वी कधीच पाहिली नाही. दुसरीकडे, नियम 256 च्या कलम तीन मध्ये असे सांगितलं गेले आहे की यावर कोणताही वादविवाद होणार नाही आणि खासदारांना सदनाच्या नियमांनुसार सदनाबाहेर जावं लागणार आहे. नियमांचे पालन विरोधक करीत नाहीत आणि ते लोकशाहीविषयी बोलतात. आम्हाला राज्यसभेत स्पष्ट बहुमत होते. 110 खासदार आमच्यासोबत होते तर 72 खासदार विरोधात होते.

एमएसपीमध्ये वाढ
कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी लोकसभेत एमएसपी वाढवण्याची घोषणा केली आहे. तोमर म्हणाले की, या निर्णयानंतर आम्हाला स्पष्ट संदेश पाठवायचा आहे की सरकारने एमएसपी हटविला नाही. त्याचबरोबर 6 रब्बी पिकांवर एमएसपी वाढविण्यात आला आहे. लत्यापैकी गहू 50 रुपये, हरभरे 225 रुपये, मसूरमध्ये 300 रुपये, मोहरीमध्ये 225 रुपये, बार्लीमध्ये 75 रुपये प्रतिक्विंटल वाढ करण्यात आली आहे.