शेतकरी आणि कामगारांचा केंद्र सरकार विरोधात उद्रेक !

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाईन- केंद्र सरकारने मंजूर केलेल्या शेतकरी आणि कामगार कायद्या विरोधात सध्या देशामध्ये ठीक ठिकाणी उद्रेक होऊन या कायद्याला विरोध दर्शविला जात आहे यात काँग्रेस सह इतर संघटनानी शेतकरी आणि कामगारांना सोबत घेऊन जागोजागी निदर्शने आंदोलने सुरुकेल्याने भाजपचे बारा वाजल्याचे चर्चेला उधाण येत आहे.

मुरबाड मध्ये भाजपाने नवीन कार्यकारणी आणि पत्रकार परिषदेचे आयोजन केले होती यावेळी कार्यकर्त्याना मार्गदर्शन करताना भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील मागील काही दिवसांपूर्वी भाजपच्या बॅनर वरती फोटो नसल्याचे सांगत कार्यकर्त्यांची खरड पट्टी काढली त्याच प्रमाणे एकंदरीत देशातील शेतकरी आणि कामगारांचा केंद्र सरकार विरोधात उद्रेक पाहून केंद्र शासनाने मंजूर केलेला शेतकरी विषयक कायदा किती शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे हे सांगण्याची वेळ भाजपवर आल्याचे या कार्यक्रमातून दिसून आले.

मुरबाडच्या भाजप कार्यकारिणी घोषणा बैठकी दरम्यान व्यासपीठावर बोलतांना खासदार कपिल पाटील यांनी विविध मुद्द्यांवर बोट ठेवला. तसेच कोणताही प्रचार न करता खासदारकीच्या निवडणुकीत मनसेचा एक लाख मतदान असतो, त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी गाफील न राहता व्हाट्सप,फेसबुक माध्यमांन वर बॅनर बाजी करत अधिक जोमाने कामाला लागण्याच्या सूचना ही केल्या.

मुरबाडच्या भाजप कार्यकारिणी जाहीर करीत शेतकरी विधेयक कायदा किती शेतकऱ्यांच्या किती फायद्याचा आहे हे घरा घरात जाऊन समजून सांगण्याचे कार्यकर्त्याना सांगण्यात आले मुरबाड एम आय डी सी हॉल मध्ये खासदार कपिल पाटील,आमदार किसन कथोरे यांच्या प्रमुख उपस्थित आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत परिषदे दरम्यान हाथरसच्या अत्याचाराचा मुद्दा घेत राहूल गांधीं समवेत सुप्रिया सुळे यांच्यावर ही टीका केल्या. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या कामगार विधेयका नंतर लगेचच मुरबाड येथील धणीवली टेक्नोक्राफ्ट कंपनीने आपला पावर प्लांट बंद केल्याने कामगारांन वर आलेल्या उपासमारीचा प्रश्न पत्रकारांनी खासदार कपिल पाटील यांना विचारताच काढता पाय घेतला त्यामुळे अनेक मुद्द्यांचा खुलासा होऊ शकला नाही. तर ही पत्रकार परिषद एवढ्यावरच थांबली.