वाळू माफियाकडून शेतकऱ्यांला मारहाण, शिरुर पोलिसांत FIR

शिक्रापुर : प्रतिनिधी –   शिरूर तालुक्यात वाळू माफियांचा कारनामे , दहशत काही कमी व्हायचे नाव घेइना आता तर चक्क निमोणे येथे वाळू माफियांकडून शेतकऱ्याला जबर मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे याबाबत शेतकऱ्यांनी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून हनुमंत साधू गरदोरे व धोंडीबा भाऊसाहेब आनुसे( रा कु-हाडवाडी,निमोणे)या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तर्डोबाचीवाडी येथील शेतकरी निमोणे या गावामध्ये कांद्याचे रोप पाहण्यासाठी गेले असता ती जमीन घोड नदीच्या कडेला असल्याने फिर्यादी व त्याचा मावसभाऊ हे दोघेजण येथील शेतकऱ्यांच्या शेतात दु चाकी वरून कांदा रोप पाहण्यासाठी गेले त्यावेळी नदीचे कडेला चार इसम वाळू भरत होते त्यापैकी दोघे जण फिर्यादीजवळ येउन तु पोलिस आहे काय , खब-या
आहे काय, तु माहिती काढण्यासाठी आला आहे काय, असे म्हणून हातात लोखंडी राॕड घेवून आले व फिर्यादीला उजव्या खांद्यावर तसेच डोक्याला उजव्या बाजुस मारहाण केली यावेळी फिर्यादी हे तेथून काही अंतरावर पळत आले व पुतण्या फोन करुन बोलून घेतले आणि त्यानंतर फिर्यादीने प्राथमिक आरोग्य केंद्र करडे येथे प्राथमिक उपचार घेऊन शिरूर पोलीस स्टेशन मध्ये येउन गुन्हा दाखल केला . याबाबत पोलिसांनी हनुमंत साधू गरदोर व धोंडिबा भाऊसाहेब आनुसे (रा.कु-हाडवाडी निमोणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक थेऊरकर करत आहे