खुशखबर ! मोदी सरकारची शेतकर्‍यांसाठी ‘खास’ योजना ; पडीक जमिनीचा वापर करून शेतकरी कमविणार १ लाख रूपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी लवकरच नवीन योजना सुरु करणार आहे. या योजनेनुसार शेतकरी आपल्या पडीक जमिनीवर सोलार पॅनलची उभारणी करून वीजनिर्मिती करू शकतो. यांमुळे शेतकऱ्यांना दरवर्षी १ लाख रुपये कमावण्याची संधी मिळणार आहे. ही माहिती केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा मंत्री आरके सिंह यांनी लोकसभेत दिली.

दोन मेगावॅट विजेची निर्मिती
केंद्रीय मंत्री आर.के. सिंह यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, शेतकरी सोलार पॅनल पडीक जमिनीवर उभारून २ मेगावॅट विजेचे उत्पादन घेऊ शकतात. यांमुळे शेतकऱ्यांना दरवर्षी १ लाख रुपये मिळतील. त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी तयार केलेली ही वीज सरकारकडून खरेदी करण्यात येणार आहे. या योजनेची घोषणा येणाऱ्या १५ ते २० दिवसांत केली जाईल. शेतकऱ्यांना विजेची निर्मिती करण्यासाठी डेव्हलपर्सची मदत घ्यावी लागेल. त्यांच्या मदतीने सोलार प्रकल्प उभारून विजेची निर्मिती करता येईल.

शेतकरी जमीन भाड्याने देखील देऊ शकतात
केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, शेतकरी स्वतःच्या जमिनीवर सोलार पॅनल उभा करून विजेची निर्मिती करू शकतात किंवा वीजनिर्मिती करण्यासाठी जमीन भाड्याने देऊन देखील कमाई करू शकतात. मंत्र्यांनी सांगितले की, चालू परिस्थितीत भारत हा सर्वात जास्त अपारंपरिक/ नवीकरणीय ऊर्जा तयार करणारा देश आहे. भारताने १,७५,००० मेगावॅट नवीकरणीय ऊर्जा निर्मिती करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. २०२२ पर्यंत हे लक्ष्य साध्य केले जाईल.

२०२० पर्यंत तयार होणार ५०,००० सूर्य मित्र
केंद्रीय मंत्री आरके सिंह यांनी सांगितले की नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने २०२० पर्यंत ५०,००० सूर्य मित्र तयार करण्यासाठी सूर्या स्किल डेव्हलोपमेंट कार्यक्रम सुरु केला आहे. या कार्यक्रमाचा उद्देश सोलार पॅनलची स्थापना, देखरेख आणि यासंबंधी ऑपरेशनच्या कामासाठी नोकऱ्यांची निर्मिती करणे हा आहे. कार्यक्रमामध्ये प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे. कार्यक्रमानुसार, प्रशिक्षणाची फी, राहण्याची व्यवस्था मंत्रालयाकडून केली जाईल.

तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स खूप काही सांगतात, जाणून घ्या

नियमित व्यायाम केल्यास होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे

रंगांचा मानवी जीवनावर पडतो सखोल प्रभाव, जाणून घ्या सत्य

तुम्हाला नखे कुरतडण्याची सवय आहे का ? मग हे नक्की वाचा

मेगाभरतीचा मार्ग अखेर मोकळा, कोणत्या विभागात किती पदे ?

आगामी विधानसभेसाठी राजू शेट्टींचं ‘मिशन ४९