मोदी सरकारकडून ₹6000 घेण्यासाठी शेतकरी घरबसल्या स्वतः करू शकतात नोंदणी, 23 सप्टें.पासून ‘स्कीम’ सुरू, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आणखी एक भेट देण्याची तयारी केली आहे. कृषि मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, शेतकरी आता 6 हजार रुपयांच्या वार्षिक रक्कमेसाठी स्वत: नोंदणी करु शकतील. ही नोंदणी शेतकरी पीएम किसान पोर्टलवर करु शकतील. ही नवी सुविधा पुढील आठवड्यात सुरु होईल. याशिवाय शेतकरी या पोर्टलवर मिळणाऱ्या रक्कमेचे स्टेट्स देखील तपासू शकतात.

आधारचे सत्यापन स्वत: करु शकतात शेतकरी –

कृषि मंत्रालयाचे संयुक्त सचिव विवेक अग्रवाल यांनी सांगितले की, आम्ही तीन टप्प्यात हे कार्य करणार आहोत. पहिल्या टप्प्यात शेतकरी पोर्टलवरुन स्वत: नोंदणी करु शकतील. आतापर्यंत शेतकरी स्वत: नोंदणी करु शकत नव्हते. दुसऱ्या टप्प्यात शेतकरी स्वत: पोर्टलवरुन आधारचे सत्यापन करु शकतात. या अंतर्गत प्रक्रियेत शेतकरी आवश्यकता भासल्यास नावात बदल करु शकतात. तिसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांना मिळणाऱ्या रक्कमेचा ते स्टेट्स देखील पाहू शकतात.

23 सप्टेंबरपासून उपलब्ध होईल सुविधा –

अग्रवाल यांनी सांगितले की, पीएम किसान पोर्टलवर पुढील आठवड्यात 23 सप्टेंबरपासून ही योजना उपलब्ध होईल. अग्रवाल म्हणाले की आतापर्यंत 6.55 लाख शेतकऱ्यांना एका पेक्षा जास्त वेळा रक्कम ट्रान्सफर करण्यात आल्या आहेत. यावर 24 हजार कोटी रुपयांचा खर्च झाला. याशिवाय राज्यांना देखील सांगण्यात आले आहे की 5 टक्के शेतकऱ्यांना रक्कम ट्रान्सफर झाल्याची तपासणी करा.

अर्थसंकल्पात झाली होती घोषणा –

फेब्रुवारीमध्ये अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची घोषणा करण्यात आली. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना एका वर्षामध्ये 6 हजार रुपये रक्कम आर्थिक मदत मिळेल. ही रक्कम 2000 – 2000 रुपये अशा तीन टप्प्यात देण्यात येईल. या योजनेसाठी सरकारने वर्षाला 87 हजार कोटी रुपये निधी दिला आहे. सुरुवातीला सरकारने 2 हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या छोट्या शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी करण्याची घोषणा केली होती. परंतू नंतर या योजनेत देशातील सर्व 14.5 कोटी शेतकऱ्यांना लागू करण्यात आली. https://pmkisan.gov.in/Login.aspx या वेबसाईच्या आधारे शेतकरी नोंदणी करू शकतात.

Visit – policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like