बैलगाडी नदी पात्रातील विहिरीत पडून वृद्धाचा मृत्यू

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – पांझरा नदी पात्रातील विहिरीत बैलगाडी पडून एका वृद्धासह बैलांचा मृत्यू झाला. ही घटना आज (मंगळवार) दुपारी घडली. पांझरा नदी पात्रात अक्कलपाडा धरणातून आवर्तन सोडण्यात आले आहे.

बटावद गावातील शेतकरी पांझरा नदी पात्रातून बैलगाडीने घरी जात होता. नदी पात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने पात्रातील विहिरीत बैलगाडी पडली. यामध्ये बैलजोडीसह वृद्धाचा शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही बातमी गावात समजताच गावकऱ्यांनी नदीपात्राच्या दिशेने धाव घेतली.

गावकऱ्यांनी वृद्धाचा शोध घेऊन त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र विहीर खोल असल्याने आणि त्यामध्ये पाणी असल्याने वृद्धाला वाचवता आले नाही. गावकऱ्यांनी वृद्धाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Loading...
You might also like