३ हजार रुपयांची लाच स्विकारताना तलाठी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

वैराग (सोलापूर) : पोलीसनामा ऑनलाईन – जमीन खरेदी-विक्री व्यवहारातील फेरफार नोंदी करण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच स्विकारताना तलाठ्याला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (बुधवार) बार्शी तालुक्यातील वैराग येथे करण्यात आली. अस्लम सरदार मलिक शेख (रा. नाईकवाडी प्लॉट, बार्शी) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे. शेख याच्यावर वैराग पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार आणि त्यांच्या इतर तीन साथीदारांनी सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. तक्रारदाराने ११ गुंठे शेतजमीनीचा व्यवहार केला होता. या व्यवहाराची ७/१२ उताऱ्यावर नोंद करण्यासाठी शेख याने तक्ररदाराकडे ३ हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराला लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता शेख याने तीन हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. पथकाने आज वैराग येथे सापळा रचून शेख याला लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले.

ही कारवाई पोलीस अधिक्षक राजेश बनसोडे आणि पुणे विभागाचे दिलीप बोरस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधिक्षक अजितकुमार जाधव, सहायक पोलीस उप अधिक्षक निलकंठ जाधवर, पोलीस निरीक्षक कविता मुसळे, पोलीस हवालदार प्रफुल्ल जानराव, उमेश पवार, श्याम सुरवसे यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

आरोग्यविषयक वृत्त –

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like