शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ‘ही’ शेती करा, सरकार देईल निम्मे पैसे; लाखो रूपयांच्या कमाईची सुवर्णसंधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या देशात विविध पिके घेतली जातात. त्यातून शेतकऱ्यांना फायदाही होतो. पण आता एक अशी शेती आहे, त्यासाठी केंद्र सरकारकडूनच प्रोत्साहन दिले जाते. याबाबतची माहिती केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिली. त्यामध्ये ते म्हणाले, की सरकार बांबूच्या शेतीसाठी प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत मिळू शकेल.

भारतातील बांबूपासून संधी आणि आव्हानांवर राष्ट्रीय चर्चा व्हर्च्युअल पद्धतीने झाली. त्यामध्ये संबोधित करताना तोमर यांनी सांगितले, की दोन दिवसांच्या या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय बांबू मिशन, नीति आयोग आणि इन्व्हेस्ट इंडियाने केले आहे. सरकारने बांबू क्षेत्राच्या विकासासाठी छाननी सुरु केली आहे. बांबूच्या शेतीपासून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढण्यासाठी महत्वपूर्ण पिक होऊ शकते. त्यामुळे रोजगाराची संधी वाढेल यासह विशेष स्वरुपात पूर्वोत्तर लोकांच्या जीवनमानात सुधारणा होऊ शकते.

मोदी सरकार लागू करतीये ही योजना
देशातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून अनेक योजना सुरु केल्या जात आहेत. ‘नॅशनल बांबू मिशन’ही त्या योजनांपैकी एक आहे. या योजनेंतर्गत बांबूच्या शेतीतून लाखो रुपयांची कमाई करता येऊ शकते. ‘नॅशनल बांबू मिशन’ या योजनेंतर्गत जर तुम्ही बांबूची शेती करता तर तुम्हाला प्रतिरोपासाठी 120 रुपये सरकारकडून दिले जाणार आहे.

शेतकऱ्यांना किती मदत मिळेल?
तीन वर्षात 240 रुपये प्रति प्लांटचा खर्च आहे. यामध्ये 120 प्रति प्लांट सरकारकडून मदत दिली जाईल. नॉर्थ ईस्ट सोडून इतर भागात याची शेतीसाठी 50 टक्के सरकार आणि 50 टक्के शेतकरी लावेल. 50 टक्के सरकारी शेअरमध्ये 60 टक्के केंद्र आणि 40 टक्के राज्य सरकारचा हिस्सा असेल. तर नॉर्थ ईस्टमध्ये 60 टक्के सरकार तर 40 टक्के शेतकरी पैसे भरेल. त्यासाठी जिल्ह्यातील नोडल अधिकारी तुम्हाला माहिती देईल.