खाकी वर्दीतली माणूसकी पोहोचली गोठ्यात !

माढा : पोलीसनामा ऑनलाइन – शेतकर्‍याला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या वडील व पत्नी यांनाही शासकीय यंत्रणेने हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यामुळे घरात इतर कोणीही नसल्याने वस्तीवरील जनावरांचा चारापाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्रा, टेंभुर्णी पोलिसांनी माणुसकी दाखवत शेतातील जनावरे, शेळ्या यांची चारापाण्याची सोय केली हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. टेंभुर्णी पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

माढा तालुक्यातील अकोले ( बु) येथील एका व्यक्तीचा अकलूज येथे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर या व्यक्तीवर पुणे येथे उपचार चालू होते. त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांची यादी करण्यात आली. त्यानुसार या व्यक्तीचे वडील, पत्नी व नोकर यांनाही शासकीय यंत्रणेने कोरोना चाचणी करण्यासाठी कुर्डुवाडी येथील शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. यामुळे त्याच्या घरात इतर कुणीही नसल्याने वस्तीवरील जनावरांच्या चारापाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. संबंधित व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे या व्यक्तीच्या घरी किंवा शेतात जाण्यास गावातील कोणीही धजावत नव्हते. मात्र, माणुसकीच्या नात्याने मुक्या जनावरांची हेळसांड होऊ नये म्हणून टेंभुर्णी पोलिसांनी संबंधितच्या शेतात जाऊन जनावरे, शेळ्या व कोंबड्या यांची चार्‍या-पाण्याची सोय केली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like