Farmers Loan | शेतकर्‍यांसाठी खुशखबर ! आता पहिल्यापेक्षा जास्त सहजपणे मिळेल कर्ज, SBI ने Adani Capital सोबत केली भागीदारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आता शेतकर्‍यांना (Farmers Loan) कर्ज मिळणे सोपे होईल. कारण, देशातील सर्वात मोठी बँक, भारतीय स्टेट बँकेने (SBI) देशात शेतकर्‍यांना कर्ज पुरवण्यासाठी अदानी कॅपिटल (Adani Capital) सोबत हातमिळवणी केली आहे. अलिकडेच एसबीआयने अदानी ग्रुप (Adani Group) च्या एनबीएफसी आणि अदानी कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड (Adani Capital Private Ltd) सोबत मिळून ट्रॅक्टर आणि कृषी मशीन्स खरेदीसाठी शेतकर्‍यांना कर्ज (Tractor Loan) देण्यासाठी करार केला आहे. (Farmers Loan)

 

NBFC सोबत मिळून कर्ज देणार
बँकेकडून जारी वक्तव्यात म्हटले आहे की, या भागीदारीतून एसबीआय पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी कृषी अवजारे खरेदी करण्यासाठी इच्छूक शेतकर्‍यांना कर्ज उपलब्ध करून देईल.

 

एसबीआय शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट (Farmers Double Income) करण्यासाठी त्यांना कृषी मशीन्स, गोदाम, किसान उत्पादक संघटनांसाठी (FPO) आर्थिक मदत करण्यासाठी अनेक एनबीएफसी (NBFC) सोबत मिळून कर्ज देण्याची प्रक्रिया वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.

काय होईल भागीदारीचा फायदा?
एसबीआयचे चेयरमन दिनेश खारा (SBI Chairman Dinesh Khara) यांनी म्हटले की, को-लेंडिंग प्रोग्राम अंतर्गत अदानी कॅपिटलसोबत देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने हात मिळवणी केल्याने आम्हाला आनंद होत आहे. ही भागीदारी एसबीआयच्या ग्राहकांची संख्या वाढवेल. (Farmers Loan)

 

यासोबतच देशाच्या कृषी क्षेत्रासोबत जोडले जाण्यास आणि भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेच्या विकासात योगदान करण्यात मदत करेल. यापुढे सुद्धा आम्ही दुर्गम भागातील बहुतांश ग्राहकांपर्यंत पोहचणे आणि शेवटच्या घटकापर्यंत बँकिंग सर्व्हिस उपलब्ध करण्यासाठी आणि जास्त एनबीएफसीसोबत मिळून काम करणे जारी ठेवू.

 

कोणत्या शेतकर्‍यांना मिळेल फायदा?
अदानी कॅपिटलचे एमडी आणि सीईओ गौरव गुप्ता (Gaurav Gupta, MD & CEO, Adani Capital) यांनी म्हटले,
आमचा उद्देश भारताच्या मायक्रो इंटरप्रिन्युअरला स्वस्त कर्ज उपलब्ध करणे आहे.

 

एसबीआयसोबत आमची भागीदारी बँकेची सर्व्हिस न मिळणार्‍या भारतीय शेतकर्‍यांना सुविधा उपलब्ध करणार आहे.
या भागीदारीच्या माध्यमातून आमचा उद्देश कृषी यांत्रिकीकरणात योगदान देणे आणि कृषी क्षेत्रात प्रॉडक्टीव्हिटी आणि इन्कममध्ये सुधारणा करणे आहे.

 

Web Title :- Farmers Loan | sbi partners with adani capital for co lending to farmers

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | अमरावतीतील दंगा राहूल गांधी यांच्या ट्विटनंतर; फडणवीस यांचा गंभीर आरोप

Nawab Malik | नवाब मलिकांचा खळबळजनक दावा; म्हणाले – ‘तो’ सल्ला मीच शरद पवारांना दिला होता’

Devendra Fadnavis | काँग्रेस वगळून देशात आघाडी करण्याला शरद पवारांची साथ; फडणवीसांच्या दाव्याने राजकारणात खळबळ