2 लाखांवर कर्ज असणार्‍या शेतकर्‍यांसाठी देखील कर्जमाफीची योजना आणणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकासआघाडी सरकारकडून 2 लाखापर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आला की 2 लाखापेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार की नाही ? यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून खुलासा करण्यात आला. दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी पॅकेज देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

2 लाखावर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी पॅकेज देण्यात येणार असून, नियमित कर्जफेड करणाऱ्यांनाही सरकारकडून सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. नव्या आर्थिक वर्षात याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मराठवाड्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तत्कालीन भाजप सरकारने जाहीर केली. मराठवाडा वॉटर ग्रीड योजना आर्थिकदृष्या परवडणारी नसल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आले त्यामुळे ही योजना तपासली जाणार आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पात वॉटर ग्रीडसाठी कुठलीही तरतूद केली जाणार नसल्याचे अर्थमंत्री अजित पवार म्हणाले. ही योजना करण्याबाबतची परिस्थिती असल्यास येत्या पावसाळी अधिवेशनात यासाठी तरतूद करता येईल असेही अजित पवारांनी सांगितले.