Farmers Long March | मुंबईवर धडकण्यापूर्वीच शेतकऱ्यांचं ‘लाल वादळ’ शमलं, सरकारसोबत सकारात्मक चर्चा

0
206
Farmers Long March | The 'red storm' of farmers subsided before it hit Mumbai, positive discussion with the government
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Farmers Long March | नाशिकहून मुंबईच्या दिशेने काढण्यात आलेल्या शेतकरी लाँग मार्चला यश आले आहे. राज्य सरकार (State Government) आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये सकारात्मक चर्चा झाली. किसान सभा शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यात दोन तास बैठक झाली, या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्या संदर्भात राज्य सरकार सकारात्मक असून शेतकऱ्यांनी लाँग मार्च आंदोलन (Farmers Long March) मागे घ्यावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शेतकरी आपला मोर्चा शुक्रवारी मागे घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

 

अखिल भारतीय किसान सभेचे (All India Kisan Sabha) शेतकरी शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या यशस्वी बैठक झाली. बैठकीनंतर तोडगा निघाला असून काही मागण्या विचारधीन आहेत. जोपर्यंत अंमलबजावणी सुरु होत नाही तोपर्यंत मोर्चा तूर्तास त्याच ठिकाणी मुक्कामी राहणार असल्याचे कॉम्रेड जीवा पांडू गावित यांनी बैठकीनंतर सांगितले.

 

 

शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळामध्ये अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अशोक ढवळे, माजी आमदार कॉम्रेड जे.पी. गावित, किसान सभेचे राज्य सरचिटणीस अजित नवले, माकपचे आमदार विनोद निकोले, किसान सभेचे नेते आणि माकपचे राज्य सचिव कॉम्रेड उदय नारकर, ‘सीटू’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी.एल. कराड हे बैठकीला उपस्थित होते.

बैठकीनंतर पुढे काय?
– आजच्या बैठकीत झालेल्या चर्चेचे, निर्णयाचे minutes उद्या सभागृहात मांडले जाणार, त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात येणार
– उद्या सभागृहात मुख्यमंत्री निवेदन केल्यानंतर शेतकरी लाँग मार्च थांबणार
– वन जमीनीच्या प्रश्नांबाबत जिल्हा पातळीवर समिती नेमणार
– समितीमध्ये सरकार आणि शेतकरी प्रतिनिधी असतील.

 

आंदोलन मागे घ्यावे – मुख्यमंत्री
राज्यातील शेतकरी, आदिवासी बांधवांच्या मागण्यांसंदर्भात राज्य शासन सकारात्मक असून
आज शेतकरी लाँग मार्चच्या (Farmers Long March) शिष्टमंडळाबरोबर सर्व मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली आहे.
यासंदर्भात विधीमंडळाच्या सभागृहात निवेदनाद्वारे माहिती देण्यात येईल.
लाँगमार्च आंदोलन थांबविण्यात यावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  केले.

 

Web Title :- Farmers Long March | The ‘red storm’ of farmers subsided before it hit Mumbai, positive discussion with the government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jalgaon ACB Trap | 25 हजाराच्या लाच प्रकरणी नायब तहसिलदारासह कोतवाल अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Maharashtra Political Crisis | 9 महिन्यानंतर सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण, निकाल कधी?

Pune Crime News | दोषारोपपत्र दाखल करण्यापूर्वीच खुनातील आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर