शेतकरी आंदोलन : शेतकर्‍यांअगोदर HM अमित शहा आणि पंजाब मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्यात चर्चा

दिल्ली : दिल्ली शहराची नाकेबंदी करण्याचा इशारा दिलेल्या शेतकरी आंदोलकांशी चर्चा करण्यापूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्याबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा चर्चा करणार आहेत.

कृषी कायदा रद्द करण्यासाठी पंजाब, हरियानाचे हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर धरणे देऊन बसले आहेत. त्याचबरोबर या कायद्याविरोधात विरोधक देशभर आंदोलन करीत आहेत. शेतकर्‍यांच्या आंदोलनामुळे दिल्लीतील वाहतूक विस्कळीत झाली आहे. यापूर्वी केंद्र सरकारबरोबर झालेल्या चर्चेतून मार्ग निघाला नाही.

शेतकर्‍यांनी कृषीविषयक तीनही कायदे रद्द करावेत. विशेष अधिवेशन बोलावून हे कायदे रद्द करावेत, नाही तर आम्ही दिल्लीतील सर्व रस्ते ब्लॉक करु असा इशारा दिला आहे.

त्यामुळे आता या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी अमित शहा यांनी पुढाकार घेतला आहे. आज सकाळी साडेनऊ वाजता शेतकरी प्रतिनिधींबरोबर बैठकीअगोदर अमित शहा आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्यात चर्चा होणार आहे.