‘पॉप स्टार’ रिहानाला क्रिकेटर प्रज्ञान ओझानं फटकारलं, यापुर्वी कंगना रणौतनं केली होती ‘खरडपट्टी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हॉलिवूड सिंगर, पॉप स्टार, ॲक्ट्रेस रिहाना (Rihanna) सध्या टीकेची धनी बनताना दिसत आहे. तिनं शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिल्यानं तिच्यावर टीका केली जात आहे. भारताच्या अंतर्गत प्रकरणात लक्ष घातल्यानं आता कंगनानंतर भारताचा माजी स्टार क्रिकेटर प्रज्ञान ओझा (Pragyan Ojha) नंही तिला फटकारलं आहे. माझ्या देशाला शेतकऱ्यांचा अभिमान आहे, ते किती महत्त्वाचे आहेत हेही माहित आहे असं तो म्हणाला आहे. ट्विटरवर ट्विट करत त्यानं रिहानाला उत्तर दिलं आहे.

आपल्या ट्विटमध्ये पुढं त्यानं लिहिलं की, मला विश्वास आहे की, हे प्रकरण देखील लवकर मार्गी लागेल. आमच्या अंतर्गत प्रकरणात कुण्या बाहेरील व्यक्तीच्या हस्तक्षेपाची गरज नाही.

काय म्हणाली होती रिहाना ?
रिहानानं ट्विटरवर एक न्यूज शेअर करत शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला. यात शेतकरी आंदोलनामुळं बंद केलेल्या इंटरनेट सुविधेचाही उल्लेख आहे. यात हरियाणातील अनेक जिल्ह्यात यामुळं इंटरनेट सेवा कशा प्रकारे बंद करण्यात आली हेही सांगितलं आहे. या न्यूजसोबत तिंन कॅप्शनमध्ये लिहिलं की, आपण यासंदर्भात चर्चा का नाही करत आहोत.