दिल्लीत आज शेतकर्‍यांचे मोठे आंदोलन, हरियाणा बॉर्डरवर सुरक्षा मजबूत, प्रभावित होणार मेट्रो सेवा

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत आज शेतकर्‍यांचे मोठे आंदोलन होत आहे. हे शेतकरी केंद्राने पास केलेल्या कृषी कायद्याला व्यापक विरोध करत आहेत. भारतीय किसान यूनियनच्या बॅनरखाली हजारो शेतकरी आज दिल्लीत आंदोलन करतील. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी हरियाणाच्या सीमेवर सुरक्षा वाढवली आहे. सोबतच आंदोलनकर्त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तर, शेतकरी आंदोलनासाठी दिल्ली मेट्रोच्या सहा लाइन्सवरील सेवा प्रभावित राहील.

विविध शेतकरी संघटनांनी जंतर मंतरवर धरणे आंदोलन करण्याची घोषणा केली होती. सूचनेनुसार, सिंघु बॉर्डरवर भारतीय किसान संघटनेचे नेते आणि कार्यकर्ते जमले होते. पंजाबपासून सुमारे 50 ट्रॅक्टर ट्रॉलींमध्ये 500 ते 600 च्या संख्येने आलेले शेतकरी दिल्लीत प्रवेशाच्या तयारीत होते. परंतु आऊटर नॉर्थ जिल्ह्याच्या पोलिसांनी आणि रिझर्व्ह दल सिंघु बॉर्डरवर तैनात असल्याने ते दिल्लीत येऊ शकले नाहीत.

दिल्ली पोलीस प्रवक्त्याने सांगितले की, राजधानीमध्ये निदर्शने केल्यास कडक कारवाई केली जाईल. शेतकर्‍यांचा मोठा जमाव गुपचुप राजधानीमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. यासोबतच अन्य जिल्ह्यांच्या पोलिसांना सुद्धा अलर्ट करण्यात आले आहे.

दिल्ली-एनसीआरच्या दरम्यान प्रभावित राहील मेट्रो
दिल्लीत शेतकरी आंदोलनामुळे मेट्रोच्या विविध लाइन्सवरील सेवा आज बाधित राहील. सकाळपासून दुपारी दोन वाजेपर्यंत अनेक ठिकाणी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मेट्रोनुसार, रेड लाइनवर दिलशाद गार्डन ते गाजियाबादकडे मेजर मोहिती शर्मा स्टेशनच्या दरम्यान सेवा बंद राहील. येलो लाइनवर सुल्तानपुर ते गुरु द्रोणाचार्य च्या दरम्यान मेट्रो ट्रेन दोन वाजेपर्यंत बंद राहील.

सर्वांत व्यस्त लाइन ब्लू लाईनवर सुद्धा याचा परिणाम होणार आहे. वैशाली ते आनंद विहारपर्यंत मेट्रो सेवा मिळणार नाही. गाजियाबाद ते या लाईनवर प्रवास करणार्‍या प्रवाशांना आनंद विहारहून सेवा मिळेल.