दिल्लीत शेतकऱ्यांचा एल्गार, किसान क्रांती यात्रा रोखण्यासाठी अश्रूधूर आणि  पाण्याचे फवारे

नवी दिल्ली: वृत्तसंस्था 
गांधी जयंती च्या मुहूर्तावर शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीत एल्गार पुकारला आहे.  भारतीय किसान युनियनची किसान क्रांती यात्रा दिल्लीत दाखल झाली आहे. स्वामीनाथ आयोगासह अनेक प्रलंबित मागण्यांसाठी आज शेतकरी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. मात्र दिल्लीच्या सीमेवरच शेतकऱ्यांना रोखण्यात आलं आहे. दिल्लीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांबरोबर आरपीएफ, पॅरामिलिटरी फोर्स सुद्धा तैनात करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या सीमेजवळ असलेल्या दिल्लीच्या पूर्व भागात पोलिसांनी 144 कलम अर्थात जमावबंदीही लागू केली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6cb5fa5c-c60d-11e8-b025-41d5e48a7fc2′]

भारतीय किसान युनियन हे आंदोलन करत आहे. ज्याला किसान क्रांती यात्रा असं नाव देण्यात आलं आहे.  उत्तराखंडच्या हरिद्वारमधून या यात्रेला सुरुवात झाली होती. मात्र दिल्लीच्या सीमेवर शेतकरी येताच पोलिसांनी त्यांना रोखलं. इतकंच नाही तर मोठ्या प्रमाणात पाण्याचे फवारे शेतकऱ्यांवर मारण्यात आले. अनेक शेतकरी ट्रॅक्टरही घेऊन आले होते. मात्र पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखलं.
[amazon_link asins=’B01D4EYNUG,B01NB1SQMO,B00FO6APKU’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8a4f5783-c60d-11e8-800e-2d3813b61a37′]

भारतीय किसान युनियनची किसान क्रांती यात्रा दिल्लीत दाखल झाली आहे. दिल्लीजवळ उत्तर प्रदेशचे सीमेवर हजारो शेतकरी एकत्र झाले. मात्र प्रशासनाने आधीच या भागात जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यातच लखनऊवरुन दोन वरिष्ठ आएएस अधिकारी हेलिकॉप्टरने गाझियाबादला रवाना झाले.

हवालदाराची आत्महत्या : दोन महिला कॉन्स्टेबलना अटक

 शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी अश्रूधूर आणि पाण्याचे फवारे
उत्तर  प्रदेशच्या सीमेजवळ हजारो शेतकरी दाखल झाले आहेत.  शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आहेत तसेच मोठ्या प्रमाणावर पाण्याचे फवारे सोडण्यात आले आहेत.  यावरून  शेतकऱ्यांच्या पुढे एवढे पोलीस उभे केले आहेत, शेतकरी दहशतवादी आहेत का असा सवाल शेतकरी नेते नरेश टिकेत यांनी विचारला.
काय शेतकऱ्यांच्या मागण्या ?
स्वामीनाथ आयोगाच्या शिफारसीनुसार कृषिमालाला भाव मिळावा
शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करा
किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्ज मिळावं
देशभरातील शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करा
14 दिवसात ऊसाचा हमीभाव निश्चित करा
एनसीआर क्षेत्रात दहा वर्ष जुन्या ट्रॅक्टरवरील बंदी मागे घ्यावी
व्यावसायिक वापरासाठीच्या साखरेला किमान 40 रुपये किलो भाव द्या

जाहिरात.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like