Farmers Protest : शेतकरी आज सरकारसोबत बैठक करणार नाहीत, बनवणार पुढील रणनीती

नवी दिल्ली : शेतकर्‍यांच्या आंदोलनाचा आज 14वा दिवस आहे. शेतकरी नेत्यांची सिंघु बॉर्डरवर आज दुपारी 1 वाजता बैठक होणार आहे. तोपर्यंत सरकार सुद्धा आपला प्रस्ताव त्यांना सोपवू शकते. या बैठकीत प्रस्तावार चर्चा होईल आणि पुढील रणनीती ठरवली जाईल. दरम्यान, आज शेतकरी केंद्र सरकारसोबत बैठक करणार नाहीत.

सरकार कृषी कायद्यातील दुरूस्तीचा प्रस्ताव लेखी स्वरूपात शेतकर्‍यांना देणार आहे. सरकारशी सहाव्या टप्प्यातील चर्चेवर आज निर्णय होईल. मात्र, या चर्चेपूर्वीच रात्री गृहमंत्री अमित शाह शेतकरी नेत्यांना भेटले. त्यांनी नवीन कृषी कायदा रद्द करण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला. आज ते लखी प्रस्ताव शेतकर्‍यांना देणार आहेत.

आंदोलन चिघळण्याची शक्यता
मात्र, शेतकर्‍यांना कृषी कायदा रद्द करणार किंवा नाही याचे होय अथवा नाही अशाप्रकारे उत्तर हवे आहे. पण सरकार यासाठी तयार नाही. यामुळे शेतकरी आंदोलन चिघळण्याची आणि लांबण्याची शक्यता आहे. सरकार कायद्यात दुरूस्तीचा प्रस्ताव आज शेतकर्‍यांना देईल, ज्यावर दुपारी 1 वाजता सिंघु बॉर्डवरील बैठकीत शेतकरी पुढील रणनीती ठरवतील. मात्र, रात्रीच्या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने आजची सरकारसोबतची बैठक शेतकरी करणार नसल्याचे समजते.

दिल्ली-हरियाणाच्या सिंघु बॉर्डरवर शेतकरी आंदोलन करत आहेत. आज त्यांच्या आंदोलनाचा 14 वा दिवस आहे. शेतकर्‍यांनी आज ठरवले की, सरकारसोबत आज कोणतीही मीटिंग करायची नाही, उलट आपल्या बैठकीत पुढील रणनीती ठरावायची.