मुख्यमंत्री पदापेक्षा शेतक-यांचे प्रश्न महत्वाचे : उद्धव ठाकरे

श्रीरामपूर : पोलीसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्री पदाबाबत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. माझ्यासाठी मुख्यमंत्री पद महत्वाचं नाही. शेतक-यांचे प्रश्न सोडविण्याला आपले प्राधान्य आहे. मुख्यमंत्री पदाची स्वप्नं पाहणाऱ्यांनी शेतकऱ्यांची समस्या सोडवाव्यात. कारण शेतक-यांच्या मनातील चीड उफाळून आल्यास सत्तेची आसने खाक होतील असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले आहे. पीक विमा केंद्राच्या उद्घटनासाठी ते श्रीरामपूरला आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

शेतकऱ्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की , ‘सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण होणार? या बातम्या येत आहे. मला त्याची पर्वा नाही. माझ्यासाठी मुख्यमंत्री पद महत्वाचं नाही. मी शेतकऱ्यांशी बांधील आहे. ज्यांच्या मनामध्ये ज्यांच्या डोक्यात मुख्यमंत्रीपदाची स्वप्न आहेत, त्यांनी आधी शेतकऱ्यांची समस्या सोडवाव्यात. कारण शेतक-यांच्या मनातील चीड उफाळून आल्यास सत्तेची आसने खाक होतील.’ शिवसेनेची ताकद ही तुम्ही आहात. तुमच्या हक्काच्या आड कोण येतो ते पाहतो, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

मुख्यमंत्री आणि माझे चांगले संबंध आहेत. त्यात लपवण्यासारखं काहीच नाही. पण याचा उपयोग मी शेतकऱ्यांच्या हितासाठी करणार करणार आहे . सरकार विरुद्ध मी आता बोलत नाही. आमचं आता जुळलंय. युती करताना शेतकऱ्यांना कर्ज माफी नव्हे तर कर्जमुक्ती ही प्रमुख अट ठेवली आहे. पुणतांबे येथील शेतक-यांनी संपावेळी भेट घेतली असता मी विनाअट पाठिंबा दिला होता. तसेच खासदारांना काम नसेल तर दिल्लीला जाऊ नका, शेतकऱ्यांची कामे असतील तर मतदार संघात थांबा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

आरोग्य विषयक वृत्त – 

आहारा संबंधीचे काही ‘समज-गैरसमज’, जाणून घ्या ‘सत्य’

मसाल्याचे पदार्थ आरोग्यासाठी लाभदायक, होतात अनेक फायदे

स्लीम व्हायचंय का ? या उपायांनी सहज कमी होईल पोट

‘हे’ उपाय केले तर चष्मा लागणार नाही, नंबर वाढणार नाही

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like