कौतुकास्पद ! शेतकऱ्याच्या मुलानं स्वतःच्या जीवावर बनवलं हेलिकॉप्टर, 20 फुट उंचीपर्यंत उडण्याचा केला दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानमधील दौसा जिल्ह्यातील आभानेरी गावातील एका तरुणाने प्रतिकूल परिस्थितीत उडू शकणारे हेलिकॉप्टर बनवून सर्वांना चकित केले आहे. चेतराम गुर्जर असे या अवलियाचे नाव आहे. आयटीआय केलेल्या या तरुणाचे हेलिकॉप्टर बनविण्याचे स्वप्न होते. त्यावर त्याने मागील एक वर्ष प्रचंड मेहनत घेत एक व्यक्ती बसू शकेल असे 400 किलो वजनाचे हेलिकॉप्टर बनवले आहे.


या तरुणाच्या दाव्यानुसार हे हेलिकॉप्टर 20 फूट उंच उडू शकते. यासाठी त्याने दररोज जवळपास 12 ते 15 तास काम केले आहे. यासाठी त्याला दहा लाख रुपये खर्च आला असून त्याचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला वडिलांनी मदत केली. हे हेलिकॉप्टर तयार करताना त्याला यामध्ये अनेक बदल करण्यात लागले. सुरुवातीला यामध्ये मोटारसायकलचे इंजिन लावण्यात आले होते. मात्र या इंजिनाच्या मदतीने उडणे शक्य न झाल्याने त्याने हेलिकॉप्टरला दोन इंजिन जोडले. त्यानंतर या हेलिकॉप्टरला उडवण्यात यश आले असून हे हेलिकॉप्टर 20 फुटांपर्यंत उंच उडू शकत असल्याचा दावा या तरुणाने केला आहे.

दरम्यान, या हेलिकॉप्टरची इंधन क्षमता हि 10 लिटर असून जर केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मदत केली तर यापेक्षा अधिक चांगले हेलिकॉप्टर तो बनवू शकत असल्याचे त्याने म्हटले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –