शेतकरी पुत्रानं शरद पवारांसाठी केलं ‘असं’ काही

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  एक असा कार्यकर्ता समोर आला आहे ज्यानं आपल्या नेत्याला ताजा भाजीपाला मिळावा म्हणून स्वत: 200 किमी अंतर दुचाकीवर पार केलं आणि ताजा भाजीपाला घरपोच दिला. ज्याच्यासाठी एका शेतकऱ्याच्या पुत्रानं हे सगळं केलं तो नेता दुसरा तिसरा कोणी नसून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आहेत. शरद पवारांसाठी या कार्यकर्त्यांनं थेट मुंबईतील पवारांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर ताजा भाजीपाला पोहोचवला. पवारांनीही ट्विट करत या कार्यकर्त्याचं कौतुक केलं आहे.

सदर कार्यकर्ता पुणे जिल्ह्यातील शिरूर ताल्युक्यातील केंदूर गावचा असून सुनील सुक्रे असं त्याचं नाव आहे. सुनील 200 किमीचा प्रवास दुचाकीवरून करत आपल्या शेतातील ताजा भाजीपाला घेऊन थेट पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचला. विशेष बाब अशी की, एवढ्या राजकीय गडीबडीत असूनही पवारांनी त्या कार्यकर्त्याची भेट घेतली. त्यानं आणलेला भाजीपाला त्यांनी स्विकारला आणि त्याचे आभारही मानले. सध्या पवारांचं हे ट्विट व्हायरल होत आहे.

आज शेतकऱ्यांसाठी पवारांनी अनेक योग्य निर्णय घेतले आहेत. जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत होता पवारांनी त्यांच हाक ऐकून त्यांना उभारी दिली. राज्यातील बळीराजा पवारांकडे शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून पहात आहे. पवारांनी शेतकऱ्यांसाठी जे काही केलं ते पाहून त्यानं हे पाऊल टाकलं. वयाच्या 80व्या वर्षी देखील ते एवढी धावपळ करत आहेत हे या सुनीलला पाहवेना झाली होती. त्यामुळे त्याच्या शेतात पिकलेला शेतमाल तरकारी माल अशा विविध भाज्या घेऊन थेट दुचाकीवरून मुंबईला जाऊन त्यानं पवारांच्या घरी दिला.

सुनीलची ही कामगिरी पाहून खुद्द शरद पवारही भावूक झाले. त्यांनी ट्विट करत त्याचे आभार मानले. जेव्हा हा तरुण शरद पवारांच्या बंगल्यावर पोहोचला तेव्हा त्याला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड भेटले. त्यानंतर पवारांनीही त्याची मेहनत पाहत त्याचे आभार मानले. शेतकऱ्यांना पुढील काळात योग्य न्याय देण्याचं आश्वसानही पवारांनी दिलं असं सुनील सिक्रेनं सांगितलं.

Visit : Policenama.com