भाजप-शिवसेनेच्या नावाने शेतकऱ्याची सुसाईड नोट

कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन – भाजप – शिवसेनेच्या नावाने सुसाईड नोट लिहित यवतमाळमधील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. धनराज बळीराम नवहटे (वय ५२) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

नवहटे याने सातत्याने होणाऱ्या पीक नुकसानीला आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. ते यवतमाळ जिल्ह्यातील पंढरवाडा तालुक्यात पहापाल गावचे रहिवासी आहेत. नवहटे यांनी शेतीसाठी स्थानिक सावकाराकडून दोन लाख रुपये कर्ज घेतले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर शेतकऱ्याने विष घेवून आपले आयुष्य संपवले आहे. त्याचा मृतदेह शेतामध्ये आढळून आला असून त्यासोबत एक सुसाईट नोटही सापडली आहे. त्यामध्ये त्याने आपल्या आत्महत्येस भाजपा आणि शिवसेनेला जबाबदार धरले आहे.