साखर कारखान्याच्या चिमणीवरून उडी मारुन शेतकऱ्याची आत्महत्या

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन – अंबादेवी साखर कारखान्याच्या चिमणीवरुन उडी मारुन एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना अमरावतीमधील अंजनगाव सुर्जी येथे घडली आहे. सचिन अर्जुन भोंडे (३४) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. शेतीच्या जागेवरून शेजारच्या शेतकऱ्यासोबत वाद असल्याने सचिनने आत्महत्या केली असावी, असा अंदाज असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.
सचिन पहाटेच घरातून दुचाकीवरुन निघाला होता. दुपारी गावाजवळील अंबादेवी सहकारी साखर कारखान्याजवळ त्याची दुचाकी एका ग्रामस्थाला दिसली. हा कारखाना अनेक वर्षांपासून बंद आहे. संशय आल्याने ग्रामस्थाने याची माहिती सचिनच्या घरच्यांना सांगितली. कुटुंबीयांनी ग्रामस्थांच्या मदतीने सचिनचा शोध घेतला असता कारखान्याच्या चिमणीजवळ त्याचा मृतदेह सापडला. यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. सचिनने चिमणीवरुन उडी मारुन आत्महच्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.

जाहिरात