Kisan Andolan : शेतकर्‍यांचा इशारा – ‘4 जानेवारीला जर निर्णय झाला नाही तर बंद करणार पेट्रोल पम्प आणि मॉल’

नवी दिल्ली : केंद्राच्या नवीन कृषी कायद्याविरोधात आंदोलन (new agricultural law) करत असलेल्या शेतकर्‍यांनी सराकरला आता नवीन इशारा दिला आहे. शेतकर्‍यांनी म्हटले आहे की, जर 4 जानेवारीला सरकारशी होणार्‍या चर्चेत ठोस निर्णय झाला नाही तर ते आंदोलन आणखी तीव्र करतील. या अंतर्गत शेतकर्‍यांनी म्हटले आहे की, ते हरियाणामध्ये पेट्रोल पम्प आणि मॉल्स (Petrol pumps and malls) बंद करतील. शेतकर्‍यांची मागणी आहे की, सरकारने तीन नवीन कृषी कायदे (New agricultural laws)
रद्द करावेत. सोबतच किमान आधारभूत किंमत (एमएसपी) ची कायदेशीर गॅरंटी द्यावी. दिल्ली सीमेवर शेतकरी मागील एक महिन्यापेक्षा जास्त काळापासून सातत्याने आंदोलन करत आहेत.

आतापर्यंत सरकार आणि शेतकरी यांच्यात चर्चेच्या सहा फेर्‍या झाल्या आहेत, परंतु अद्यापपर्यंत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. बुधवारी शेतकरी संघटना व सरकार यांच्यात वीजेचा दर आणि पराली जाळण्याच्या दंडावर चर्चा झाली. असे म्हटले जात आहे की दोन्ही पक्षांमध्ये या विषयावर काही सहमती सुद्धा झाली आहे. परंतु तीन नवीन कृषी कायदे मागे घेणे व एमएसपीला कायदेशीर दर्जा देण्यासाठी आतापर्यंत कोणतीही चर्चा झालेली नाही. आता 4 जानेवारी रोजी पुन्हा एकदा शेतकरी संघटना आणि सरकार यांच्यात चर्चा होईल.

सरकारला इशारा
सिंघू सीमेवरील पत्रकार परिषदेला संबोधित करताना शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी म्हणाले की, सरकारबरोबर झालेल्या बैठकीत शेतकर्‍यांनी उपस्थित केलेल्या केवळ पाच टक्के प्रश्नांवर चर्चा झाली आहे. त्यांनी आपल्या मुख्य मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. शेतकरी नेते युद्धवीर सिंह म्हणाले की, जर केंद्र सरकारला असे वाटत असेल की, शेतकर्‍यांचा विरोध शाहीन बागेसारखा असेल तर ते चुकीचे आहे. ते म्हणाले, शाहीन बागेत त्यांनी जसे केले त्याप्रमाणे सरकार आम्हाला या ठिकाणाहून हटवू शकत नाही.

सरकार एमएसपीवर बोलत नाही
स्वराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव म्हणाले की, तीनही कृषी कायदे रद्द करावेत आणि एमएसपीची कायदेशीर हमी या दोन मुख्य मुद्द्यांवर सरकार एक इंचही पुढे सरकलेले नाही. त्यांनी दावा केला की सरकारने एमएसपीला कायदेशीर हमी देण्याच्या बाबतीत तत्वतः नकार दिला आहे. शेतकरी नेते विकास म्हणाले, 4 जानेवारीला सरकारसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही तर आम्ही हरियाणामधील सर्व मॉल, पेट्रोल पम्प बंद करण्याच्या तारखेची घोषणा करू.