ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! आता नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाखांपर्य़त मिळणार बिनव्याजी कर्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कर्जमाफीच्या निर्णयानंतर राज्यातील शेतकऱ्यांसाठी farmers ठाकरे सरकारने Thackeray government आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना farmers 1 लाखापर्यंतच बिनव्याजी कर्ज मिळत होते. त्यात वाढ करून आता शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज interest free loans घेता येणार आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उमुख्यमंत्री अजित पवार Chief Minister Ajit Pawar यांनी शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंतचे पिककर्ज बिनव्याजी देण्याची घोषणा अर्थसंकल्पात Budget केली होती. त्या घोषणेची अंमलबजावणी करण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

Murder in Pune | धक्कादायक ! पुण्यात वडिलांच्या आजारपणाला कंटाळला मुलगा, पठ्ठ्यानं ब्लेडनं बापाचा गळाच चिरला; पोलिसांनी मुसक्याच आवळल्या

राज्याच्या मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक गुरुवारी (दि.10) पार पडली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रिमंडळाच्या मान्यतेमुळे पिककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना farmers आता 3 लाखापर्यंतचे पिककर्ज शून्य टक्के व्याजदराने मिळू शकणार आहे. शेतकऱ्यांसाठीच्या बिनव्याजी कर्जाच्या निर्णयावरील शिक्कामोर्तबासह आणखी काही निर्णय आज घेण्यात आले आहेत.

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय खालीलप्रमाणे
1) राज्याच्या किनारपट्टीत कांदळवन प्रवाळ संवर्धन, उपजीविकेलाही प्रोत्साहन, ग्रीन क्लायमेट फंडाचे सहाय्य.
2) नाशिक येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मॉडेल आयटीआय
3) दुय्यम न्यायालय अन् मुंबई नगर दिवाणी व सत्र न्यायालय येथे जिल्हा सरकारी वकील आणि सहाय्यक सरकारी वकील नेमणार
4) शहरांमध्ये प्राचीन अतिप्राचीन वृक्षांचे संरक्षण करणार, हेरिटेज ट्री संकल्पना
5) महाराष्ट्र परिचर्या परिषदेवर पूर्वलक्षी प्रभावाने मुदतवाढ

 

Aurangabad News | औरंगाबादमध्ये वीज कोसळून युवतीचा दुर्देवी मृत्यू, 1 जण गंभीर जखमी