शेतकऱ्यांना नाही मिळणार व्याजावर व्याज माफी योजनेचा लाभ, जाणून घ्या कारण

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : अर्थ मंत्रालयाने गुरुवारी हे स्पष्ट केले की, कृषी आणि त्याच्याशी जोडलेल्या कामांशी संबंधित कर्जांवर व्याजावर व्याज माफी योजना उपलब्ध होणार नाही. चक्रवाढ आणि साधे व्याज यातील फरक भरण्याच्या संदर्भात वित्त मंत्रालयाने गुरुवारी ‘ग्रेस रिलीफ पेमेंट स्कीम’ वर अतिरिक्त सामान्य प्रश्न जारी केले. त्याचबरोबर अर्थ मंत्रालयाने सांगितले की, 29 फेब्रुवारीपर्यंत कर्ज घेणाऱ्यांना क्रेडिट कार्डवरील थकबाकीसाठी या योजनेचा लाभ मिळणार आहे.

मंत्रालयाने जाहीर केला होता FAQ – एफएकएक्यूमध्ये म्हंटले की, या सवलतीसाठी बेंचमार्क दर कराराचा दर असेल. ज्याचा वापर क्रेडिट कार्ड जारीकर्ताद्वारे ईएमआय कर्जासाठी केला जातो. अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले की, एकूण आठ क्षेत्रे या योजनेंतर्गत येतात. पीक आणि ट्रॅक्टर कर्ज शेती आणि संबंधित कामांत येते. ज्याचा या योजनेत समावेश नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) सर्व कर्ज देणाऱ्या संस्थांना मंगळवारी दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी नुकत्याच जाहीर केलेल्या व्याज माफी योजनेची अंमलबजावणी करण्यास सांगितले होते. दरम्यान, या योजनेअंतर्गत दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याज 1 मार्च 2020 रोजी सहा महिन्यांसाठी माफ केले जाईल.

कोणाला होईल फायदा ? –
सरकारच्या या योजनेचा लाभ ज्या ग्राहकांनी मोरेटोरियमची निवड केली नाही त्यांनाच देण्यात येईल. याशिवाय त्यांच्याकडे दोन कोटी रुपयांपर्यंतची कर्ज आहे. ही रक्कम ग्राहकांच्या कर्ज खात्यात 5 नोव्हेंबरपर्यंत ठेवण्यास सांगण्यात आले आहे. नंतर बँका आणि वित्तीय संस्था सरकारकडून या रकमेचा दावा करु शकतात.

कोणत्या लोकांना योजनेचा लाभ मिळणार नाही? –
ज्यांनी फेब्रुवारी 2020 पर्यंत कर्जाचा ईएमआय भरला आहे. फक्त त्या लोकांनाच फायदा होईल, ज्यांचे खाते फेब्रुवारीच्या अखेरीस नॉन-परफॉर्मिंग एसेट (एनपीए) म्हणून वर्गीकृत केले गेले आहे अशा ग्राहकांना याचा फायदा होणार नाही. त्याशिवाय मुदत ठेवी, समभाग आणि बाँडवर घेतलेल्या कर्जावर ही सवलत मिळणार नाही.

या कर्जांवर मिळेल सवलत –
व्याजावरील व्याज माफी योजनेवर अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या एफएक्यू मध्ये म्हटले आहे की, या अंतर्गत एमएसएमई कर्ज, शिक्षण कर्ज, गृह कर्ज, क्रेडिट कार्ड थकबाकी, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज यावर सवलत देण्यात येईल.

75 टक्के ग्राहकांना होईल लाभ –
रेटिंग एजन्सी क्रिसिलच्या मते, सुमारे 75 टक्के ग्राहकांना छोट्या कर्जावरील चक्रवाढ व्याज सवलतीतून फायदा होईल. यामुळे सरकारी तिजोरीवर सुमारे साडेसात हजार कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.

You might also like