‘शेतकऱ्यांना’ लवकरच मिळणार ‘Good News’ ! दोन टप्प्यात ‘कर्जमाफी’चे सरकारकडून ‘संकेत’

नागपूर, पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील शेतकऱ्यांना महाविकासआघाडीचे सरकार लवकरच गोड बातमी देण्याच्या तयारी आहे. सध्या नागपूरात विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यावेळी महाविकासआघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे संकेत देण्यात आले आहेत. हे आर्थिक वर्ष संपायचा आत शेतकऱ्यांना दोन टप्प्यात कर्जमाफी देण्याच्या तयारीला सरकार लागले आहे.

कर्जमाफीच्या आढाव्यासाठी सरकारकडून पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. हे पथक राज्यातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीसह कर्जमाफी कशी देता येईल याचा आढावा घेणार आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला प्रधान्य असल्याचे महाविकासआघाडीकडून सांगण्यात येत आहे. पहिला टप्पा 2020 च्या आधी, दुसरा टप्पा एप्रिल 2020 मध्ये अशा प्रकारे शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते.

असे देखील वृत्त आहे की बँकांकडून शेतकरी कर्जमाफीची माहिती मागवण्यात आली आहे. राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करुन कशा प्रकारे पैसा उभा करता येईल यावर विचार या बैठकीत झाल्याचे सांगण्यात येत आहे.

आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची नागपूरात बैठक घेतली. यावेळी शेतकरी कर्जमाफीबाबात तात्काळ निर्णय घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

तसेच मंत्रिमंडळाच्या विस्तारवर देखील त्यांनी आमदारांशी चर्चा केली. यावेळी हिवाळी अधिवेशन संपल्यावर दोन दिवसात मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चा करण्यात आली. यावर बोलताना राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक म्हणाले की शरद पवारांनी सांगितले आहे की मंत्रिमंडळाचा विस्तार अधिवेशन संपल्यानंतर करावा. ते यासंबंधित मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेणार आहेत आणि मंत्रिमंडळविस्तारावर सविस्तर चर्चा करणार आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/