जम्मू काश्मीरचे नेते फारूक अब्दुल्ला भडकले ; म्हणाले, ‘ते आमची हत्या करू इच्छितात’

श्रीनगर : नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी ३७० कलम हटविण्याच्या निर्णयावरून  संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मोदी सरकारच्या कलम ३७० कलमाच्या निर्णया विरोधात आपण कोर्टात जाऊ. आम्ही दगड किंवा ग्रेनेड टाकणार नाही. ते आमची हत्या करू इच्छितात. आम्हाला शांततेवर विश्वास आहे आणि आम्ही आमची लढाई शांततेत लढू. फारूक अब्दुल्ला, त्यांच्या निवासस्थानाबाहेरील पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देत होते.
https://twitter.com/ANI/status/1158690601816248320

फारुख अब्दुल्ला असेही म्हणाले की,  माझा मुलगा ओमर अब्दुल्लाला फार वेदना होत आहे. तसेच अब्दुल्ला यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही  हल्ला चढविला. अब्दुल्ला म्हणाले, फारूक अब्दुल्ला अटकेत नसून ते स्वत: च्या इच्छेनुसार स्वत: च्या घरात आहेत असे गृहमंत्री अमित शहा यांचे म्हणणे ऐकून मला फार वाईट वाटले. हे खरे नाही. अब्दुल्ला म्हणाले की,  काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० आणि कलम ३५ए  ची भारत सरकारकडून हमी देण्यात आली होती.  येथे मला माझ्या घरात तुरुंगवास भोगावा लागत आहे. आम्ही ७० वर्षे लढा देत आहोत आणि आज आम्ही दोषी ठरलो आहोत.
https://twitter.com/ANI/status/1158690532564111361

आरोग्यविषयक वृत्त –