ज्या कायद्यान्वये फारूक अब्दुला अटक झालेत तो त्यांच्याच वडिलांनी बनवला होता ‘लाकूड’ चोरांसाठी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यापासून राज्यातील फारूक अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांसारख्या अनेक नेत्यांना नजरकैद करून ठेवले आहे. मात्र आता फारूक अब्दुल्ला यांच्याविषयी मोठी बातमी समोर येत आहे. राज्यातील अधिकारीक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल्ला यांना सार्वजनिक सुरक्षा अधिनियम या कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. हा कायदा त्यांच्या वडिलांनी म्हणजेच शेख अब्दुल्ला यांनी 1978 मध्ये लागू केला होता.

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री  शेख अब्दुल्ला यांनी कधी विचारही केला नसेल कि, आपल्या या कायद्यामुळे एक दिवस आपल्या अटक केली जाईल. हा कायदा राज्यात लाकडांच्या होणाऱ्या तस्करीला आळा घालण्यासाठी लागू केला होता. त्यावेळी मोठया प्रमाणात लाकडांची तस्करी केली जात असे. त्यामुळे या कायद्यांअंतर्गत अटक केलेल्या नागरिकांना कमीतकमी दोन वर्षांची तर शिक्षा होतेच. तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या आणि पाच वेळा खासदार राहिलेल्या फारूक अब्दुल्ला यांना पोलिसांनी या कायद्याअंतर्गत अटक केली आहे.

काँग्रेसने केला विरोध

माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांना या कायद्यांतर्गत अटक करण्यात आल्यानंतर काँग्रेसने केंद्र सरकारची कडक शब्दांत निंदा केली आहे. एका राष्ट्रभक्त नेत्याबरोबर अशा प्रकारे वागणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पक्षाचे जेष्ठ नेते गुलाम नबी आजाद यांनी म्हटले आहे कि, देशाच्या अखंडतेसाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्याला अशाप्रकारे कैद करणे पूर्णपणे चुकीचे आहे.