… तर काश्मीरचे भारतातील विलीनीकरणही हंगामी ; फारूक अब्दुल्ला पुन्हा एकदा ‘बरळले’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी काश्मीर प्रश्नावर मोठे विधान केले आहे. कलम ३७० याविषयी भाष्य करताना त्यांनी एक वादग्रस्त विधान करून खळबळ उडवून दिली आहे. काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हे जर अस्थायी स्वरूपाचे असेल तर काश्मीरचे भारतातील विलीनीकरण हेसुद्धा हंगामी स्वरूपाचे आहे, असे विधान जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी केले आहे.

काल संसदेत गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीरबाबत संसदेत केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना अब्दुल्ला यांनी हे विधान केले आहे. यावेळी अधिक बोलताना ते म्हणाले की, महाराज हरी सिंग यांनी ज्यावेळी काश्मीरचे भारतात विलीनीकरण केले त्यावेळी ते हंगामी स्वरूपाचे होते. त्यामुळे या विलनीकरणासोबत कलाम ३७० हेदेखील हंगामीच होते. यावेळी करण्यात आलेल्या विलयपत्रात लिहिण्यात आले होते की, जम्मू-काश्मीरमध्ये जनमत संग्रह घेऊन तेथील लोकांना भारतात सामील व्हायचे आहे की पाकिस्तानमध्ये हे जाणून घेतले जाईल, मात्र आजपर्यंत तसे काहीही करण्यात आलेले नाही.

त्यामुळे जर येथील लोकांचे मत विचारात घेतले जाणार नसेल तर कलम ३७० कसे काय हटवणार, असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला. गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीरमधील राष्ट्रपती राजवट वाढवण्यासंदर्भात राज्यसभेत प्रस्ताव ठेवला होता. या प्रस्तावावर चर्चेवेळी अमित शहा यांनी “जे भारताला तोडण्याची भाषा करतील त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल. तर जे भारतासोबत राहू इच्छितात त्यांची पूर्ण काळजी घेतली जाईल. तसेच काश्मीरबाबतचे कलम ३७० ही घटनेतील अस्थायी तरतूद आहे, असे अमित शहा यांनी संसदेत सांगितले होते.

त्यावर प्रत्युत्तर देताना अब्दुल्ला यांनी हे भाष्य केले आहे. दरम्यान, या विषयावरून अमित शहा यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर टीका करत काश्मीर प्रश्न काँग्रेसमुळे चिघळला असल्याचे आरोप त्यांनी पुन्हा एकदा केला आहे. १९४९ मध्ये काँग्रेसने केलेल्या चुकीमुळे भारताला याचे परिणाम भोगावे लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर यावेळी जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रपती राजवटीची मुदत अजून सहा महिन्यांनी वाढवण्याच्या प्रस्तावास राज्यसभेने मंजुरी दिली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

सौंदर्य वाढविण्यासाठी खोबरेल तेल आहे गुणकारी

पोट आणि कंबर अधिक आकर्षक करण्यासाठी करा’स्ट्रेचिंग’

शरीराला पाण्याची गरज का असते ? जाणून घ्या ही ५ कारणे

महिलांनो, बाळंतपणानंतर पुन्हा मिळवता येऊ शकतो कमनीय बांधा