फारुख अब्दुल्ला यांनी सांगितलं ‘फेक‘ कॉल मागचं सत्य, म्हणाले – ’ममतांच्या समर्थनार्थ बंगालला जाण्यासाठी देणार होते 50 लाख’

पोलिसनामा ऑनलाईन – नॅशनल कॉन्फरन्सचे (एनसी) अध्यक्ष फारूक अब्दुल्ला रविवारी उधमपूर येथे पोहोचले, तेथे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्याचवेळी त्यांनी एक खळबळजनक खुलासा करत विरोधकांनी त्याला सापळा रचून फसविल्याचा आरोप केला. पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना फारुख अब्दुल्ला म्हणाले, त्याच महिन्यात मला झारखंडवरून फोन आला, त्यावेळी जेव्हा मला सांगण्यात आले होते की झारखंडचे मुख्यमंत्री तुमच्याशी बोलतील. मात्र, ते इतर कॉलवर व्यस्त होते.

नॅशनल कॉन्फरन्सचे (एनसी) अध्यक्ष फारुख अब्दुल्ला पुढे म्हणाले, साधारण अर्ध्या तासानंतर पुन्हा त्यांचा फोन आला, त्यावेळी त्यांना सांगण्यात आले की, झारखंडच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देण्यासाठी पश्चिम बंगालला जात आहेत, असे सांगितले आहे. जर तुम्ही अर्थात फारुख अब्दुल्ला देखील पश्चिम बंगाल ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देण्यासाठी आलात तर तुम्हाला पन्नास लाख रुपये मिळतील.

या आवाहनानंतर त्यांना संशय वाटला. म्हणून यानंतर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या झामुमो पक्षाच्या खासदारांशी बोलले, त्यावेळी बोलल्यानंतर सत्य समजले. यावेळी ते खासदार अब्दुल्ला यांना म्हणाले की, त्यांच्या वतीने काहीही बोलले गेलेले नाही. झारखंडचे खासदार पुढे म्हणाले की, असाच फोन देवगौडा यांनाही आला आहे.

यावर नॅशनल कॉन्फरन्सचे (एनसी) अध्यक्ष फारुख अब्दुल्ला कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले की, आमचा विरोधी पक्ष कोणत्याही लेव्हलला जाऊ शकतो, कारण त्यांच्याकडे खूप पैसा आहे आणि पॉवर आहे, त्यामुळे विरोधी पक्ष मला अडकवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

यापूर्वी काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात नॅशनल कॉन्फरन्सचे (एनसी) अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांना मोठा दिलासा दिला आहे. फारुखने कलम 370 च्या विरोधात दिलेल्या जबाबाच्या निषेधार्थ, त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला भरण्याची मागणी केली होती. यामुळे संतप्त झालेल्या सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, सरकारच्या मताव्यतिरिक्त अन्य विधान करणे देशद्रोह नाही. असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यालाच 50 हजार रुपये दंड ठोठावला आहे.

नॅशनल कॉन्फरन्सचे (एनसी) अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले की, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देण्यासाठी पश्चिम बंगालला जात असल्याचे सांगितले होते. जर फारुख अब्दुल्ला हे देखील पश्चिम बंगाल ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देण्यासाठी आले तर त्यांनाही पन्नास लाख रुपये मिळतील. हे सत्य सांगून नॅशनल कॉन्फरन्सचे (एनसी) अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी विरोधी पक्ष कोणत्या पातळीला जाऊ शकतो, हे कार्यकर्त्यांना दाखवून दिले आहे. तसेच नॅशनल कॉन्फरन्सचे (एनसी) अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांना विरोधी पक्ष कशाप्रकारे जाळं टाकून फसवत आहे, हे देखील उघड करून सांगितलं आहे.

सध्या केंद्रात असलेली भारतीय जनता पक्ष अर्थात भाजप अनेक प्रकारे निवडणूक लढवून पुन्हा सत्तेत राहण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी हा पक्ष कोणत्याही पातळीला जाण्यासाठी, कोणत्याही गोष्टीसाठी काहीही करण्यासाठी नेहमी धडपड करत असतो. तसेच कोणतेही कारण, निमित्त काढून तसेच सत्तेचा गैरवापर करून कशाप्रकारे अनेक इतर नेत्यांना जाळ्यात फसवतो. तसेच जेलमध्ये टाकण्यासाठी धडपड असतो. याचा खुलेआम चाललेला खेळ नॅशनल कॉन्फरन्सचे (एनसी) अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी कार्यकर्त्यांना उघडा करून सांगितला.