फारूक अब्दुलांची मुलगी आणि बहिण पोलिसांच्या ताब्यात, कलम 370 विरोधात करत होत्या आंदोलन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांची मुलगी साफिया आणि बहीण सुरैया यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोघीही कलम 370 हटवल्याविरोधात आंदोलन करत होत्या. काश्मीर मधील कलम 370 रद्द केल्यानंतर फारुख अब्दुल्ला यांना त्यांच्याच घरात नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. फारुख अब्दुल्ला यांच्यासोबत त्यांचे पुत्र उमर अब्दुल्ला आणि माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना देखील नजर कैदेत ठेवण्यात आले आहे.

सोमवार पासून जम्मू काश्मीरातील पोस्ट पेड मोबाईल सेवा सुरु करण्यात आली होती. फारुख अब्दुल्ला यांना उमर अब्दुल्ला यांच्या व्यतिरिक्त साफिया अब्दुल्ला, हिना अब्दुल्ला आणि सराह अशा तीन मुली आहेत. सराहचा विवाह राजस्थानचे उप मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेता सचिन पायलट यांच्याशी झाला आहे.

मंगळवारी श्रीनगर येथे विशेष दर्जा हटवल्याप्रकरणी महिलांचा मोठा समूह हातात बॅनर घेऊन आंदोलन करत होता. यावेळी महिलांनी काळ्या रिबीन बांधत घोषणाबाजी देत आंदोलन सुरु केले होते. मात्र पोलिसांनी त्यांना आंदोलन बंद करण्याचा इशारा दिला आणि शांतीत निघून जाण्याचे आवाहन केले मात्र महिलांनी याला विरोध केला. अखेर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या महिलांना मीडिया समोर बोलण्यास मज्जाव केला. मात्र मीडियाला दिलेल्या वक्तव्यांमध्ये आंदोलनकर्त्या म्हणाल्या काश्मीरचा काढून घेतलेला विशेष दर्जा आणि राज्याचे दोन केंद्र शासित प्रदेशात केलेले विभाजन आम्ही अस्विकार करत आहोत.

नागरिकांचे स्वातंत्र्य आणि मूलभूत अधिकारांची मागणी करत महिलांनी सांगितले की, त्यांना केंद्र सरकारकडून धोका आणि अपमान मिळाला आहे. यावेळी महिलांनी अटक केलेल्या महिलांना सोडण्याची तसेच ग्रामीण आणि शहरातून सैन्य माघारी घेण्याची मागणी केली. तसेच काश्मीरात खोट्या बातम्या पसरवणाऱ्या राष्ट्रीय मीडियाबाबत महिलांनी यावेळी आक्रोश व्यक्त केला.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी