साडे तीन वर्ष नोकरी न करता पगार घेत राहिला ‘बेपत्ता’ झालेला पोलिस, मृत्यूनंतर झाला ‘पर्दाफाश’

फर्रुखाबाद : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेश पोलिसांच्या निष्काळजीपणाचे एक प्रकरण समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका कॉन्स्टेबलची पोलिस लाइनमधून जहानगंज पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली. परंतु तो कर्तव्यावर सामील झाला नाही आणि साडेतीन वर्षे बेपत्ता झाला. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे या कालावधीत पोलिस विभागाने ‘बेपत्ता’ पोलिसाला ड्युटीविना १७ लाख २२ हजार पगार दिला आहे. गेल्या शुक्रवारी जेव्हा आजारपणामुळे पोलिसाच्या मृत्यूची बातमी आली तेव्हा हा घोटाळा उघडकीस आला. ही बाब उघडकीस आल्यानंतर अधिकाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. पोलिस लाइनच्या जीडी कार्यालय, कॅश टेबल आणि अकाउंट्स शाखेत गोंधळ उडाला. रात्रीतून अधिकाऱ्यांनी रेकॉर्ड तपासून चौकशीचे आदेश दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, कानपूर ग्रामिण जिल्ह्यातील कपूरपूर खेड्यातील रहिवासी नरेशसिंग यांना १९९५ साली पोलिस विभागात दाखल केले गेले. २०१५ मध्ये त्यांची फर्रुखाबाद येथे बदली झाली. नरेशसिंग लाइनमध्ये आला आणि कर्तव्य बजावत राहिला. ४ एप्रिल, २०१६ रोजी नरेशसिंगची पोलिस लाइनमधून जहानगंज पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली. पण नरेशसिंग पोलिस ठाण्यात हजर झाला नाहीत आणि तो बेपत्ता झाला.

साडेतीन वर्षे ड्युटीशिवाय घेता होता पगार
पोलिस लाइन कर्मचारी व अधिकाऱ्यांशी संगनमत करून त्याने कर्तव्य न करता साडेतीन वर्षे पगार घेणे चालू ठेवले. दरमहा, त्याच्या कर्तव्याचा अहवाल पोलिस लाइनच्या जीडी कार्यालयातून चालविला जात असे. महिन्याच्या १५ तारखेला कॅश काउंटरवरील व्यक्ती जीडी कार्यालयातून त्याचा पगार करित होती.

कुटुंबातील सदस्यांनी मृत्यूची माहिती दिली
लाईनच्या कॅश टेबलवरून त्याच्या कर्तव्याची माहिती दिल्यानंतर पगाराचे बिल तयार केले आणि दर महिन्याच्या २० तारखेला बँक खात्यावर पाठविले. शिपायाला मासिक ४१ हजार रुपये ड्युटीशिवाय मिळत राहिले. गेल्या शुक्रवारी पोलिस त्याच्या गावात मरण पावला. दुसर्‍या दिवशी शनिवारी कुटुंबातील सदस्यांनी विभागात नरेश सिंगचा मृत्यू झाल्याची बातमी दिली. ही माहिती समजताच एकच गोंधळ उडाला. पोलिस लाइन आणि मुख्यालयात पोलिसाच्या तैनातीचा तपास लागला. नरेश पोलिसांच्या नोंदीमध्ये ड्युटीवर हजर होता. जहानगंज पोलिस ठाण्यात बदलीचा आदेशही मिळाला नाही. जीडी कॅशियरचे काम होते की, त्याने पोलीस स्टेशनला माहिती द्यावी कि, कॉन्स्टेबल नरेशची दबली करण्यात आली आहे. प्रकरण उघडकीस आल्यावर मात्र अधिकाऱ्यांचे धांदल उडाली. वेतन बिलातील सर्व कामे आरआय व सीओ लाइनच्या सहीनंतरच देयकासाठी पाठविण्यात आली होती.

‘तपास अहवाल येताच कारवाई केली जाईल’
या प्रकरणातील पोलिस अधीक्षक (एसपी) अनिल कुमार मिश्रा यांनी संगितले कि, कर्तव्याविना पोलिसाला पगार देणे ही गंभीर बाब आहे. पोलिस लाइनची जीडी शाखा आणि कॅश काऊंटरच्या संगनमताने हा खेळ झाला आहे. लाइन अधिकाऱ्यांनी देखील याची देखरेख केली पाहिजे. सलग, साडेतीन वर्षे अशी चूक कशी होऊ शकते? संपूर्ण प्रकरणात चौकशी सुरू असल्याचे मिश्रा म्हणाले. तपास अहवाल येताच कारवाई केली जाईल. कोणत्याही गुन्हेगाराला सोडले जाणार नाही.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/