Video : ‘Tik Tok सुपरस्टार’ नकली विराट कोहलीचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली नेहमीच चर्चेत असतो. मैदानात असेल तेव्हा आपल्या फलंदाजीमुळे विराट चर्चेत असतो. याशिवाय तो आपल्या पर्सनल लाईफमुळेही अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून विराट टीकटॉकवर दिसत आहे. विराटचे अनेक टीकटॉक व्हिडीओ सोशलवर व्हायरल होत आहेत.

या व्हायरल होणाऱ्या टीकटॉक व्हिडीओत दिसत आहे की, विराट कोहली एकापेक्षा एक फनी गोष्टी करताना दिसत आहे. तुम्ही विचार करत असाल ना की, विराटची छोट्यात छोटी गोष्ट मीडियाची हेडलाईन बनत असते. मग विराटने केलेल्या टीकटॉकवरील अॅक्टींगची बातमी कशी काय नसेल झाली. जर तुम्हाला खरंच असं वाटत असेल तर थोड थांबा. टीकटॉकवर सध्या चर्चा होत असलेला हा विराट कोहली खराखुरा विराट नाही तर गौरव अरोरा आहे.

गौरवची शरीरयष्टी आणि चेहरा हुबेहुब विराट कोहलीसारखा आहे. एवढंच काय तर गौरवची दाढीही विराटसारखीच आहे. गौरव विराट कोहलीप्रमाणेच टीकटॉक विडीओज बनवत आहे. त्याचे हे व्हिडीओ लोकांना खूप आवडत आहे.

गौरवचे टीकटॉकवर 4 मिलियन्सहून अधिक फॉलोवर्स आहेत. एवढेच नाही तर गौरवच्या टीकटॉक प्रोफाईलवर जवळपास 33 मिलियन्स लाईक्स आहेत. त्याच्या प्रत्येक व्हिडीओला लाखो व्ह्युज असतात. वर्ल्ड कपदरम्यान गौरवने अनेक असे व्हिडीओ बनवले होते जे लोकांना मोठ्या प्रमाणात आवडले होते. त्याचे असे अनेक व्हिडीओ तेव्हाही व्हायरल झाले होते.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like