Hair Care Tips : केसांना मजबूत आणि दाट बनवण्यासाठी घरीच बनवा खोबरेल तेल, चंपी करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाईन – आपली त्वचा शरीराचा सर्वात महत्वाचा अंग आहे, परंतू त्वचेकडे अधिक दुर्लक्ष केले जाते. फिट राहण्यासाठी आपण पोट वाढले आहे, चरबी वाढली आहे याकडे लक्ष देतो, पण आपण त्वचा कशी दिसते याकडे लक्ष देत नाही. कोरडी, कोमेजलेली त्वचा हे निरोगीपणाचे लक्षण आहे. त्यातही आजच्या काळात केसांसंबंधी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तुम्ही आजीच्या हाताने केसांना तेलाची मालिश करू शकता. त्यायुळे तुम्हाला फायदा होईल. सेलिब्रेटी न्यूट्रीनिस्ट ऋतुजा दिवेकर यांनी याबाबत सविस्तर सांगितले आहे.

ऋतुजा म्हणतात, ‘आपली स्कैल्प’ हा त्वचेचा हिस्सा आहे आणि आपल्यापैकी अनेक लोक केस खराब होण्याच्या, केस गळण्याच्या समस्यांचा सामना करतात. परंतू स्कैल्पच्या आरोग्याची काळजी जितकी घ्याल तितके चांगले आहे. खरंतर जादा लोक हे मानतात की, जर तुम्ही पीसीओडी किंवा थायराइडचा शिकार असाल तर केसांचे गळणे अथवा त्वचा खराब होणे ही सामान्य बाब आहे. या समस्येपासून सुटकारा मिळवण्यासाठी महाग प्रोडक्ट्सचा वापर केला जातो. पण किचनमध्ये उपलब्ध तेलांचा वापर करून तुम्ही तुमच्या टाळूची त्वचा आणि केसांना हेल्दी ठेवू शकता.

केसात होणाऱ्या कोंड्याला समूळ नष्ट करण्यासाठी घरगुती उपाय, पांढऱ्या केसांपासून मिळेल सुटकारा

नारळाचे तेल गरम करा. तेल गरम झाल्यानंतर त्यात कडीपत्ता टाका आणि गॅस बंद करा. त्यानंतर यात मेथीचे दाणे, १-२ गुलहड फुल, १ चमचा Aliv seeds घाला. रात्रभर हे मिश्रण थंड होऊ द्या. मिश्रण थंड झाल्यावर गाळून घ्या आणि केसांना या तेलाने मालिश करा.

त्वचेसाठी फायदेशीर कोरफडीचा गर, चेहऱ्यावर तेज येण्यासाठी ‘अशाप्रकारे’ वापरा कोरफड

ऋतुजा दिवेकर म्हणतात, कोरफडीच्या गराचा वापर रात्री झोपण्यापूर्वी करा अथवा कमीत कमी ३० मिनिटे त्वचेवर गर लावून ठेवा. त्याचसोबत तेलाने त्वचेची मालिश आठवड्यातून एकदा नक्की करा.
सर्वात आधी टाळूवर मधोमध थोडे तेल टाका. त्यानंतर हातांचा वापर करून हळूहळू मालिश करा. त्यानंतर इंडेक्स आणि मिडिल फिंगरचा वापर करून संपूर्ण केसांची मसाज करा. अंगठ्यांना कानांच्या मागे आणि बोटांच्या माध्यमातून केसांची मालिश करा. त्यानंतर मानेच्या मागे गोलाकार दिशेने मसाज करावा.