हेअर कलर केसांवर दीर्घकाळ टिकण्यासाठी आत्मसात करा ‘या’ 4 टीप्स, लवकर नाही लावावा लागणार दुसर्‍यांदा

पोलिसनामा ऑनलाइन – अनेक लोक नियमित हेयर कलरचा वापर करतात. चुकीच्या जीवनशैलीमुळे केस कमी वयातच पांढरे होऊ लागले आहेत. बाजारात विविध ब्रँडचे हेयर कलर उपलब्ध आहेत. परंतु, कोणताही हेयर कलर कितीही दावा केला तरी एकदा लावल्यानंतर महिनाभर सुद्धा टिकत नाही. यामुळे सतत हेयर कलर लावावा लागतो. काहींना ते शक्य नसते. आज आम्ही तुम्हाला काही अशा हेयर टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचा हेयर कलर अनेक दिवस टिकून राहू शकतो.

या टिप्स लक्षात ठेवा 

1 एसएमएस शॅम्पूचा वापर
केसांना कोणताही शॅम्पू वापरल्यास तो तुमचा हेयर कलर कमजोर करतो. यासाठी ज्या शॅम्पूमध्ये सोडियम लॉरेल सल्फेटचा वापर केलेला असतो तो अजिबात वापररू नका. हे शॅम्पू एसएमएस युक्त असतात, ज्यामुळे केस धुताना खुप फेस होतो. अशा शॅम्पूमध्ये नैसर्गिक तेल खुप कमी असते. ज्यामुळे केस कमजोर होतात.

2 केस हवेत कोरडे करा
नेहमी लक्षा ठेवा केस हवेत सुखवा. कारण हेयर कलरच्या केसांना हीट, स्टायलिंग, हेयर ड्रायरचा वापर करू नये.

3 गरम पाण्याने धुवू नका
हेयर कलरचे कसे धुताना गरम पाण्याचा वापर करू नका. कारण गरम पाण्यामुळे केंसाचे क्यूटिकल्स उघडून सूजतात. यामुळे हेयर कलरचा रंग कमी होतो. कोमट पाण्याचा वापर करा.

4 बाहेर जाताना केस करा कव्हर
घरातून बाहेर पडताना केस कपड्याने नेहमी झाकून घ्या. कारण कडक उन्हामुळे केसावर वापरलेला हेयर कलर डल होतो.