टाचांना भेगा पडल्या आहेत ? मग घरीच तयार करा ‘हे’ आयुर्वेदिक तेल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   अनेकदा ऋतू बदलला की शारीरिक व्याधी डोकं वर काढू लागतात. यामध्येच हिवाळा सुरु झाल्यावर थंडीत पाण्यात खूपवेळा राहिल्याने किंवा मातीमुळे अनेकांच्या पायांना भेगा (cracked heel) पडतात. टाचांमधून रक्त (blood) येतं किंवा बऱ्याच वेळा त्वचा कोरडी झाल्यामुळे त्रास होतो. त्यामुळे ही समस्या टाळण्यासाठी अनेकदा महागडी औषधे, क्रीम वापरली जातात. परंतु त्याने फारसा फरक पडत नसल्याची तक्रार अनेक जण करतात. म्हणूनच यावर तोडगा म्हणून घरगुती (homemade) उपाय करणं फायदेशीर ठरतं. यात घरीच तयार करता येणाऱ्या सारखी क्रीम कोणती ते जाणून घेऊयात.

साहित्य

– नैसर्गिक मेण – 50 ग्रॅम
– मोहरीचं तेल – 100 ग्रॅम
– कापूर – 10 ग्रॅम

कृती

सर्वात प्रथम मोहरीचं तेल गरम करा आणि त्यात मेण टाकून ते वितळून घ्या. मेण पूर्णपणे वितळल्यानंतर त्यात कापूर टाका. हे मिश्रण थोडा वेळ गरम झाल्यानंतर गॅस बंद करा. मिश्रण थंड झाल्यावर एका डबीत भरुन ठेवा. रोज रात्री झोपण्यापूर्वी हे तेल टाचांचा नियमितपणे लावा.